शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वापराच्या बर्फामुळे धोका; अन्न व औैषध प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 02:55 IST

रसवंतीगृह तसेच कुल्फीवाल्यांकडून सर्रास वापर

रावेत : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, आइस्क्रीम, बर्फाचे गोळे, फळांचा रस त्यात होणारा बर्फाचा वापर तसेच बर्फापासून तयार होणारे खाद्यपदार्थ याची मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच बर्फाची मागणीही वाढली आहे. परंतु सर्रासपणे औद्योगिक वापराचा बर्फ खाद्यपदार्थांमध्ये वापरला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.मार्च महिना सुरू झाल्याने उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रसवंती तसेच विविध खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फ कारखान्यातून बर्फवाटप करताना सर्रासपणे बर्फ रसवंती तसेच थंड पेयांच्या दुकानांपुढे जमिनीवर टाकला जातो तेथून नागरिक, वाहने जातात तरीदेखील नागरिक थंड पेय पिताना दिसून येतात. परंतु व्यावसायिकांकडून बर्फ खरेदी करून आणल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बर्फाची वाहतूक करीत असताना कुठे सायकलने तर कुठे घाणेरड्या वाहनांचा वापर करण्यात येत आहे. त्यासोबत बर्फ कोणत्या पाण्याने तयार होतो, ते पाणी शुद्ध आहे की नाही. याबाबत काहीही माहिती नसते. रसवंती गृह, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे आढळून येणारा बर्फ हा खाण्याचा बर्फ नसतोच. औद्योगिक वापरासाठीचा हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे खाद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडून बर्फ उघड्यावरच ठेवण्यात येत असतो. त्यामुळे रस्त्यावरील धूळ तसेच विषाणूंचा त्यावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. व ते पेय पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारांना आमंत्रण मिळत आहे. सध्या रसवंती, लिंबू सरबत, जूस सेंटर, आइस्क्रीम, फळविक्रेते, कुल्फीवाले आदींची दुकाने रस्त्याच्या कडेला थाटलेली दिसून येतात. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांची पावले आपोआप थंड पेयाच्या दुकानांकडे वळलेली पहावयास मिळत आहेत. रस असो वा लिंबूसरबत या सर्वांमध्ये बर्फाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग