शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘रिंग’वरून भाजपात दुही, चारशे कोटींच्या निविदा प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 03:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजूर केलेली ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार अमर साबळेंसह शिवसेनेचे खासदार आणि राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजूर केलेली ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार अमर साबळेंसह शिवसेनेचे खासदार आणि राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणावरुन भाजपात दुही निर्माण झाली आहे. भाजपाच्या खासदार साबळे आणि स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्यात जुंपल्याने त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेली बैठक तूर्तास रद्द केली आहे. प्रमुख पदाधिकारी परदेश दौºयावर असल्याने बैठक रद्द केल्याचे समजते.पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षात जुगलबंदी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चारशे पंचवीस कोटींचे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचले आहे. विविध विकासकामात गैरव्यवहार होत असल्याचे, आरोप विरोधकांबरोबरच सत्ताधा-यांनीही केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे भाजपा पदाधिकाºयांना मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. सत्ताधाºयांसह याप्रकरणात आयुक्तांवर देखील गंभीर आरोप होत आहेत. खासदारांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकासाच्या कामाचा अहवाल मागविला आहे. खासदारांनी चौकशीची मागणी केल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे खासदार समर्थकांनी सावळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.भाजपाच्या पदाधिकाºयांमध्येच चांगली जुंपली आहे. याबाबत झाडाझडती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर आज रात्री बैठक बोलविली होती. परंतु, अचानक ती बैठक रद्द करण्यात आली आहे. एक प्रमुख पदाधिकारी परदेश दौºयावर आहे. त्यामुळे तूर्तास बैठक पुढे ढकलली आहे.निष्ठावान भेटणार मुख्यमंत्र्यांना- पिंपरी-चिंचवडमध्ये निष्ठावान विरुद्ध पक्षातील नवीन असा वाद पुन्हा उफाळला आहे. खासदारांच्या राजीनाम्यामुळे निष्ठावान गट अधिक आक्रमक झाला असून, आगामी काळात निष्ठावान पदाधिकारी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, असे विश्वसनीयरीत्या समजते.- भाजपाच्या निष्ठावान पदाधिकाºयांची, खासदार समर्थकांची शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास निगडीत गुप्त बैठक झाली. बैठकीत निष्ठावान कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले होते. मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन पालिकेत गैरव्यवहार होत असल्याचे आरोप पक्षावर होत आहेत. तसेच पालिकेतील काही अधिकारी गैरव्यवहाराला हातभार लावत असून, या सर्वांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यानच्या काळात, भाजपाच्या पक्ष संघटनेत फेरबदल केले. खासदार समर्थकास संघटन सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावरून जबाबदारीमुक्त केले. जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने मुख्यमंत्र्यांना निष्ठावान कार्यकर्ते भेटणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड