शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी बांधकामांना दिलासा, शास्तीकराविषयी नागरिकांना नोटीस न देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:46 IST

अनधिकृत बांधकाम शास्ती वसुलीची कारवाई महापालिकेकडून सुरू आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत, महापालिकेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शुक्रवारी घेराव घातला होता.

पिंपरी : अनधिकृत बांधकाम शास्ती वसुलीची कारवाई महापालिकेकडून सुरू आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत, महापालिकेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शुक्रवारी घेराव घातला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेतली. त्या वेळी रहिवाशी बांधकामांना नाही, तर व्यावसायिक बांधकामांना नोटिसा देऊ, असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले आहे.महापालिकेकडून साधारण एक लाख थकबाकीदार मिळकतीधारकांना नोटिसा दिल्या जात आहेत. यामध्ये शास्तीकर न भरणाऱ्या व्यावसायिक आणि निवासी मिळकती अधिक आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने गुरुवारी आंदोलन केले होते. शास्तीकराबाबत आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत बैठक झाली. शिवसेनेच्या शिष्टमंडळात गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक नीलेश बारणे, अमित गावडे, अ‍ॅड. सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, मीनल यादव यांचा शिष्टमंडळात समावेश होता.शहरातील मिळकत धारकांना शास्तीकराच्या नोटिसा गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शास्तीकर वगळून मिळकतकर स्वीकारावा. शास्तीकर वगळून मिळकतकर स्वीकाराला जात होता. आता अगोदर शास्तीकर भरून घेतला जातो. त्यानंतरच मूळ कर भरून घेतला जात आहे, हे वास्तव शिष्टमंडळाने प्रशासनास सांगितले. सरकारने शास्तीकराचा कायदा केला आहे. शास्तीकर वगळून कर घेता येत नाही. तसेच संगणकात तशी तरतूद करता येणार नाही. तशी तरतूद करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे आयुक्तांनी सांगितले.केवळ व्यावसायिक मिळकतींना नोटीसनिवासी मालमत्ताधारकांना पालिका नोटीस देणार नसल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. निवासी मालमत्तांना जप्तीच्या नोटिसा दिल्या जाणार नाहीत, याबाबत करसंकलन विभागाला सूचना देखील त्यांनी ताबडतोब दिल्या आहेत. परंतु, व्यावसायिक मिळकतधारकांना नोटिसा दिल्या जातील. त्यांच्याकडून शास्तीसह कर वसूल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवासी मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवासी मिळकतधारकांनी शास्तीकर भरू नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. तसेच सध्या राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शहरातील तिन्ही आमदारांनी अधिवेशनात शास्तीकर रद्द करण्याचा निर्णयाची मागणी करावी, अशी माहिती गटनेते राहुल कलाटे यांनी दिली.