शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शाळा स्थलांतराला विरोध, पहिल्याच दिवशी विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:21 IST

शाळा स्थलांतराला विरोध करत गुुरुवारी पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना बसवून ठेवले. प्रेमलोक पार्कमधील महात्मा जोतिबा फुले इंग्रजी माध्यमाच्या इमारतीत शहराचे नवे पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चिंचवड  - शाळा स्थलांतराला विरोध करत गुुरुवारी पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना बसवून ठेवले. प्रेमलोक पार्कमधील महात्मा जोतिबा फुले इंग्रजी माध्यमाच्या इमारतीत शहराचे नवे पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेथील शाळा दळवीनगर येथील नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणावरून पालकांनी याला विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने गुरुवारी विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारावर बसले. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे.शहरात नव्याने सुरू होणारे पोलीस आयुक्तालय चिंचवडमधील प्रेमलोक पार्कमध्ये सुरू होणार आहे. यासाठी येथील शाळा दळवीनगरमध्ये स्थलांतरित झाली असल्याचे फलक महापालिकेच्या वतीने लावण्यात आल्याने संतप्त पालकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. नवीन इमारत रेल्वे लाइनलगत असल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार असून, येथील वातावरण सुरक्षित नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन शाळेत पाठविणार नसल्याचे सांगत ठिय्या आंदोलन करण्यात आले.पालक व विद्यार्थी तीन दिवसांपासून प्रेमलोक पार्क येथील शाळेच्या प्रवेशद्वारावर येऊन आंदोलन करत आहेत. स्थानिक नगरसेवक, महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, महापालिकेतील सत्ताधारी पक्षनेते एकनाथ पवार, पोलीस अधिकाऱ्यांनी पालकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देऊन समजूत काढली. मात्र पालक निर्णयावर ठाम असल्याने तोडगा निघाला नाही.सुसज्ज इमारतीत केवळ शिक्षकचशाळेचा शुक्रवार पहिला दिवस असल्याने शाळा नवीन जागेत स्थलांतरित केल्याचा फलक गुरुवारी लावण्यात आला. शिक्षक नवीन जागेत रुजू झाले. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांना नवीन शाळेत पाठविले नाही. नवीन शाळेत गुरुवारी १२ मुलांनी हजेरी लावली. प्रेमलोक पार्कमधील शाळेसमोर पालकांचा विरोध लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.महापालिका प्रशासनाने दळवीनगर येथील शाळेची नवी इमारत सुसज्ज केली आहे. आधुनिक सोयीसुविधा असणारी सर्व व्यवस्था येथे करण्यात आली आहे. नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. मात्र पालकांच्या भूमिकेमुळेनवीन इमारतीत विद्यार्थी रस्त्यावर बसून आहेत. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर अभ्यास केला. काहींनी कवायतीचे प्रकारही केले.

टॅग्स :Schoolशाळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड