शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय खासगीकरणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 02:11 IST

भोसरीत आंदोलन : विरोधकांसह सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी काढली रॅली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमार्फत भोसरी येथे उभारलेल्या रुग्णालय खासगीकरणास भाजपाने विरोध केला आहे. आज सुमारे पाच हजार नागरिकांनी भोसरीत आंदोलन केले. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांसह विरोधीपक्षाने आयुक्तांना निवेदन दिले. खासगीकरणास विरोध दर्शविला.भोसरीतील रुग्णालयाच्या खासगीकरणास शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. त्यापाठोपाठ भाजपातील एका गटानेही विरोध दर्शविला आहे. भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

नीलेश मुटके, शेखर लांडगे, भरत लांडगे, आशा लांडगे, संतोष लांडे आदी सहभागी झाले होते. त्यानंतर नगरसेवक रवी लांडगे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या आंदोलनात भोसरीतील सर्वसामान्य नागरिकांसह शहारातील आधार सोशल फाउंडेशन, वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती, नवशक्ती बालाजी ग्रुप, अखिल भारतीय छावा मराठी युवा संघटन, जय महाराष्ट्र कामगार सेना, महाराष्ट्र मजूर पक्ष, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, दलित स्वयंसेवक संघ इत्यादी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.मनपाच्या वाय.सी.एम. रुग्णालयांमध्ये शहरातीलच नव्हे तर शहराबाहेरून पुणे जिल्ह्यातून रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. शहरामध्ये वाय.सी.एम. रुग्णालयासह, तालेरा, जिजामाता, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भोसरी, आकुर्डी, यमुनानगर, इंदिरा गांधी, खिंवसरा पाटील, इत्यादी रुग्णालये सद्य:स्थितीत कार्यरत असून, ती समाधानकारक वैद्यकीय सुविधा शहरातील नागरिकांना पुरवित आहेत. शहरातील गोरगरीब नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्यच आहे. परंतु या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. या आधी रुबी अल केअर खासगी संस्थेमार्फत चालविण्यास दिले आहे. त्याचा अनुभव क्लेशदायक आहे. तसेच वाय.सी.एम. रुग्णालयात लवकरच पदवीव्युतर अभ्यासक्रम चालू होणार आहे. त्यामुळे या संस्थेतून तज्ज्ञ डॉक्टर्स मनपास उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खासगीकरण कशासाठी? आणि कोणासाठी? - दत्ता साने, विरोधी पक्षनेता महापालिकाआरोग्य वैद्यकीय सुविधा ही मनपाची मूलभूत सुविधा असून, शहरातील गोरगरीब, झोपडपट्टीतील व सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा अतिशय महत्त्वाची आहे. मनुष्यबळ नाही म्हणून खासगीकरण करणे योग्य आहे का? उद्या मनुष्यबळ नाही म्हणून महापालिका खासगी तत्त्वावर चालवायला देणार का? खासगीकरणाने व्यावसायिक रूप प्राप्त होणार आहे.- रवी लांडगे, नगरसेवक, भाजप