शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीला पुन्हा खोडा, प्रकल्पाला आॅक्टोबरचा नवा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:51 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटीला गेल्या आठ वर्षांपासून तारीख पे तारीख मिळत आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटीला गेल्या आठ वर्षांपासून तारीख पे तारीख मिळत आहे. आॅक्टोबरचा मुहूर्त महापालिकेने काढला असला, तरी जोपर्यंत उच्च न्यायालयातील याचिकेवरील स्थगिती उठविली जात नाही, तोपर्यंत या प्रकल्पाला गती मिळणे अवघड आहे.महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत शहरातील मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी कोट्यवधीचा निधी मिळाला होता. त्या अंतर्गत शहरातील बीआरटी सुरू करण्याचा प्र्रकल्प सुरू करण्याचे नियोजन केले गेले. शहरातील पहिल्या मार्गाचे काम २००९ मध्ये सुरू झाले. हा मार्ग होता निगडी ते दापोडी. या मार्गावर ग्रेड सेपरेटर असल्याने बीआरटी कशी राबवायची याचे नियोजन तत्कालीन सत्ताधाºयांनी केले नव्हते. त्यामुळे हा प्रकल्प सत्ताधाºयांच्या अंगलट येऊ नये, म्हणून मार्ग तयार होऊनही सुरू केला नाही. या मार्गावर ‘मर्ज इन आणि मर्ज आऊट’ येथे कोणती व्यवस्था करायची याबाबत नियोजन झाले नव्हते. या ठिकाणी अपघात होऊ शकतात, अशी शक्यता वाहतूक पोलीस विभागानेही व्यक्त केली होती. तसेच या रस्त्याचे सेफ्टी आॅडिट न झाल्याने एक याचिका दाखल झाली. त्यामुळे मार्ग सुरू होण्यास खोडा बसला होता. कोट्यवधी रुपये खर्चूनही गेल्या आठ वर्षांत मार्ग सुरू झालेला नाही.केवळ आश्वासनेचदापोडी ते निगडी बीआरटीबाबत सत्ताधारी आणि प्रशासन केवळ आश्वासनेच देत आहे. अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. राष्टÑवादी काँग्रेसनेही तीन वेळा उद्घाटनाचा मुहूर्त काढला होता. त्यानंतर भाजपानेही मे, आॅगस्ट आणि आता आॅक्टोबर असा मुहूर्त काढला आहे. अनेक वेळा मुहूर्त काढूनही बीआरटी मार्ग सुरू झालेला नाही. हा मार्ग कधी सुरू होणार असा प्रश्न शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.>दापोडी ते निगडी मार्गावरील बीआरटी मार्गावरील बसथांब्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मार्गावर १४ बसस्टॉप आहेत. तसेच सिग्नल यंत्रणेचे काम सुरू आहे. आयआयटीच्या पथकामार्फत आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरक्षेसंदर्भात चाचण्या होतील. त्यानंतर या संदर्भातील रिपोर्ट न्यायालयात सादर करून बीआरटी सुरू करण्यासंदर्भात परवानगी मागता येईल. सुरक्षा रक्षक नियुक्तीचे काम सुरू आहे. या मार्गाविषयी पीएमपी प्रमुखांशीही चर्चा झाली आहे. बस यंत्रणाही सज्ज आहे.- श्रावण हर्डीकर, आयुक्त