शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुबईच्या धर्तीवर होणार पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 16:33 IST

येथील गावठाणातील साडेसात एकर जागेत महापालिकेच्या वतीने चार कोटी चाळीस लाख रुपयेचे दुबईच्या धर्तीवर राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, मार्च अखेरीस अंतिम दुसऱ्या टप्प्यातील कामे होणार पूर्णदुबई येथे विकसित व्हर्टिकल गार्डन या संकल्पनेच्या आधारावर असणार दुसरा टप्पा

पिंपळे गुरव : येथील गावठाणातील साडेसात एकर जागेत महापालिकेच्या वतीने चार कोटी चाळीस लाख रुपयेचे दुबईच्या धर्तीवर राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, मार्च अखेरीस अंतिम दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण होणार आहेत. महापालिकेने २००६ मध्ये राजमाता जिजाऊ या उद्यानाची निर्मिती केली. पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरातील नावाजलेल्या उद्यानापैकी हे एक भव्य-दिव्य उद्यान आहे. हे उद्यान पिंपळे गुरव किंवा सांगवी पुरतेच न राहता पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर टाकणार आहे. या उद्यानातील पन्नास फुटी डायनासोर हे मुख्य आकर्षण आहे. या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पाठपुरावा केला होता. २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात अर्थिक तरतूद करण्यात आली होती. दुबई येथे विकसित केल्या जाणाऱ्या व्हर्टिकल गार्डन या संकल्पनेच्या आधारावर हा दुसरा टप्पा असणार आहे.

 

उद्यानाची वैशिष्टयेव्हर्टिकल गार्डन, भव्य तिकीटघर व चार प्रवेशद्वार थ्रीडी गेट, एव्हेंजर वॉल, फ्रील, चंद्रकोर आकारात ४२ बाय १४ आकाराचे भव्य कारंजे, वॉकिंग ट्रॅक, हरी वॉटर हाऊस, फ्लावर लेक, विविध रंगी फुलांच्या बागा, दीड लाख लिटर पाण्याची टाकी, दोन स्वच्छतागृह, चार फूट उंची असलेल्या सुरक्षा भिंतीची आडीच फुटाची उंची वाढविणे, वाहनव्यवस्था आदी कामे पूर्ण होणार आहेत.

 

मार्च अखेर काम पूर्ण होणारइंजिनिअरच्या नियोजनाप्रमाणे व निवेदेप्रमाणे उत्कृष्ट दजार्चे काम सुरू आहे. काम मोठे आहे. कामाच्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. मनुष्यबळामुळे काम प्रगतिपथावर आहे. मार्च अखेर नूतनीकरणाचे काम पूर्ण करणार आहे.-  मे. एस. एस. साठे, कंत्राटदार काम युद्धपातळीवर सुरू

 

तीन महिने पावसामुळे कामाला कमी गती होती़ आता पावसाने उघडीप दिल्यामुळे कामास वेग येत आहे. सद्य:स्थितीत कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. युद्धपातळीवर काम सुरू आहे. चार महिन्यांपर्यंत काम पूर्णत्वास येईल. -  संजय कांबळे, कार्यकारी अभियंता, ड प्रभाग

 

पाठपुरावा सुरू आहेसुरू असलेल्या कामाची पाहणी आणि पाठपुरावा करतो. कामामध्ये काही बदल असल्यास दुरुस्ती करून घेतो. सध्या उद्यानातील वॉकिंग ट्रॅक नूतनीकरणाच्या कामामुळे बंद आहे. ही गैरसोय एक महिन्यात दूर करण्याचा प्रयत्न आहे.- शशिकांत कदम, ड प्रभाग अध्यक्ष 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड