शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘गाडीचा जॅमर काढ, नाहीतर नोकरीच घालवितो तुझी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 02:30 IST

वाहतूक पोलिसाशी कारमालकाची अरेरावी

पिंपरी : माझ्या कारला जॅमर का लावलाय? पावती करणार नाय... काय करशील... होऊन होऊन काय होईल? फाशी होईल का? कसलं चलन? आधी तू जॅमर काढ, असा एकेरी उल्लेख करून वाहतूक पोलिसाशी उद्धटपणे वागणाऱ्या, तसेच ‘तुला बघून घेतो, नोकरीच घालवतो तुझी’ असे धमकावणाऱ्या दोघांवर हिंजवडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केला.हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या अमोल जनार्दन बनसोडे (वय ३२) यांच्या समवेत हा प्रकार घडला. त्यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत पांडुरंग मालपोटे (वय ४५, रा. कातरखडक, मुळशी) आणि किरण छबन मालपोटे (वय ३०) या दोघांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. गणपत मालपोटे याला अटक झाली असून, दुसºया आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.शिवाजी चौक, हिंजवडी येथे पीएमपी थांब्याजवळ ‘नो र्पाकिंग’ फलकाखाली उभ्या मोटारींना पोलिसांनी जॅमर लावले. त्यातीलच एक एमएच १४ ईएम ७०८० या क्रमांकाची मोटार होती. मात्र, या मोटारीचे जॅमर काढ, असे एकेरी भाषेत आरोपी वाहतूक पोलिसांना सांगत होते. दंडाची पावती फाडा, नंतर जॅमर काढतो, असे सांगणाºया पोलीस कर्मचाºयाशी आरोपींनी हुज्जत घातली. जॅमर तुला काढावेच लागेल, असे शिवराळ भाषेत दरडावून पोलिसाच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांशी हुज्जतीच्या प्रकारांत वाढहिंजवडी, वाकड परिसरात अशा प्रकारे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एका आलिशान मोटारीचा मालक वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालताना, त्याला ‘तुला पगार कितीए रे?’ असे खिजवताना दिसतो. मात्र, कायद्यापुढे सर्व समान असल्याने त्या मग्रूर मोटारचालकाला तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. अशा प्रकारे पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने कायद्याची अंमलबजावणी करणाºया पोलिसांची भीती कायदा तोडणाºयांना का वाटत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा