शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

करवाढ फेटाळली

By admin | Updated: February 21, 2016 03:04 IST

आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सुचवलेली करवाढ सर्वसाधारण सभेने फेटाळली. तसेच महापालिकेची जुनी हद्द आणि नव्याने समाविष्ट झालेला

पिंपरी : आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सुचवलेली करवाढ सर्वसाधारण सभेने फेटाळली. तसेच महापालिकेची जुनी हद्द आणि नव्याने समाविष्ट झालेला भाग असे वर्गीकरण करून करयोग्य मूल्य एकसमान निश्चित करण्याची उपसूचना शनिवारी मंजूर करण्यात आली. फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर करवाढीचा प्रस्ताव होता. स्थायी समितीने यापूर्वीच करवाढ प्रस्ताव फेटाळत कराचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अंतिम मान्यतेसाठी या प्रस्तावावर शनिवारी झालेल्या महासभेत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेमध्ये सभागृहनेत्या मंगला कदम, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक बाबा धुमाळ, काँगे्रसचे भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँगे्रसचे अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, रामदास बोकड, सुरेश म्हेत्रे, मनसेचे अनंत कोऱ्हाळे यांनी भाग घेतला. सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘‘रेडी रेकनरच्या नावाखाली दर वर्षी करयोग्य मूल्य आपोआप वाढविले जाते. त्यामुळे कररचनेत बदल होत आहे. सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणीपुरवठा लाभ कर, विशेष साफसफाई करातही वाढ होत आहे. त्यामुळे करवाढ न होताही रहिवाशांना जादा मालमत्ता कराची बिले येतात.’’ तसेच आगामी वर्षात छुपी करवाढ न करता आयुक्तांनी मालमत्तांचे करयोग्य मूल्य एकसमान ठेवावे, अशी त्यांनी मागणी केली. करआकारणी आणि करनिश्चितीसाठी महापालिकेने अ, ब, क आणि ड विभाग निश्चित केले आहेत. या विभागातील वर्गीकरणानुसार मालमत्तांचे करयोग्य मूल्य दर वर्षी निश्चित केले जाते. सन २००६पासून या वार्षिक भाडेदरात वाढ होत आहे. रेडी रेकनरच्या नावाखाली दर वर्षी करयोग्य मूल्य वाढविले जात आहे. त्यामुळे करांचे दर ‘जैसे थे’ ठेवले, तरी जादा बिले येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादीने करवाढ प्रस्ताव फेटाळत आगामी वर्षापासून एकसमान करयोग्य मूल्य निश्चित करावे, असा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)सदस्यांचा विरोध : पुण्याचा कचरा मोशीत नकोचपुण्यातील कचरा मोशीत टाकण्यास शासनाने अनुकूलता दर्शविली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पुण्यातील कचरा मोशीत टाकण्यास तीव्र विरोध केला. वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला. या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा सभागृहात अवलोकनार्थ सादर करण्यात आला. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्यांनी मोशीत कचरा टाकण्याच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त करीत त्यास विरोध केला. मंगला कदम म्हणाल्या, ‘‘पुण्याच्या कचऱ्याचे काय करायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याकडील कचरा वाढत असताना जागा अपुरी पडत आहे. अशातच पुण्याचा कचरा इकडे कशासाठी? पिंपरी-चिंचवडच्या कचऱ्यासाठी पुण्यानेच आपल्याला जागा द्यावी. अथवा पिंपरी-चिंचवडचाच कचरा तिकडे न्यावा. पुण्याचा कचरा शहरात आणण्यास आमचा विरोध राहणार असून, शासनानेदेखील यासाठी महापालिकेस विचारणा करू नये.’’सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘‘पुण्याला ‘स्मार्ट’ केलंय, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्यांनी ‘स्मार्ट व्हायचं अन् कचरा मात्र पिंपरी-चिंचवडला पाठवायचा, हे योग्य नाही. हा अन्याय सहन केला जाणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू.’’ पुणे सुंदर दिसावे, स्मार्ट दिसावे, यासाठी त्यांना स्मार्ट सिटी करण्यात आले. मात्र, या योजनेसाठी पिंपरी-चिंचवडचा प्रस्तावच पाठविला नाही, ही दुर्दैवी बाब आहे अन् आता पुण्याचा कचरा इकडे आणणे सहन केले जाणार नाही. कणभर कचरादेखील मोशीत येऊ देणार नसल्याची भूमिका शमीम पठाण यांनी मांडली.