शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहरात भंगारवाल्यांकडून होतेय '' रेकी ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 20:53 IST

घरातील महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांनी दरवाजा उघडला असता भंगार लेने के लिए साहब ने बुलाया था, कुछ भंगार है क्या, अशी विचारणा केली जाते...

ठळक मुद्देगुन्हेगारीचा उद्देश : हातगाडी घेऊन गल्लीबोळात परप्रांतियांचा संशयास्पद वावर   

- नारायण बडगुजर -

पिंपरी : हातगाडी घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील गल्लीबोळात फिरणाऱ्या काही भंगारवाल्यांकडून गुन्ह्यांच्या उद्देशाने '' रेकी '' होत असल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसलेल्या परप्रांतियांचा यात भरणा आहे. दिवसाढवळ्या कोणत्याही दरवाजावर '' नॉक '' केले जाते. घरातल्या महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांनी दरवाजा उघडल्यावर भंगार लेने के लिए साहब ने बुलाया था, असे त्यांच्याकडून सांगण्यात येते. याप्रकारामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, याबाबत पोलीस अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.

कामगार नगरी असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातून तसेच परराज्यातूनही बेरोजगारांचा लोंढा येत आहे. यात परप्रांतियांची संख्या लक्षणीय आहे. यातील काही परप्रांतिय हातगाडी घेऊन शहरातील गल्लीबोळात फिरून भंगार खरेदी करतात. यात जुनी पुस्तके, वह्या, पुठ्ठे, प्लॅस्टिक, लोखंडी वस्तू आदींची खरेदी केली जाते. यातील काही भंगारवाले संशयास्पद वावरत आहेत. गल्लीबोळात फिरताना मोठ्याने आवाज न देता थेट दरवाजा वाजविण्यात येतो. घरातील महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांनी दरवाजा उघडला असता भंगार लेने के लिए साहब ने बुलाया था, कुछ भंगार है क्या, अशी विचारणा केली जाते. घरात पुरुष किंवा कर्ता व्यक्ती नसल्याने ज्येष्ठ नागरिक किंवा महिला या प्रकारामुळे घाबरत आहेत. घराची पाहणी करून तसेच गल्लीबोळातील प्रत्येक घरात कोण राहात आहेत, घरात मुले किती आहेत, त्यांच्या शाळेची वेळ, महिलांचे दागिने, घरातील टीव्ही, फ्रीज आदी वस्तू, वाहने किती आहेत, याची पाहणी काही भंगारवाल्यांकडून होताना दिसून येते.  

सण, उत्सव असल्याने घरोघरी साफसफाईचे कामकाज केले जाते. त्यामुळे जुन्या वस्तू भंगारात विकल्या जातात. अशा वस्तू खरेदी करण्यासाठी भंगारवाले थेट घरी येतात. त्यामुळे अनेक कुटुंबाकडून समाधान व्यक्त केले जाते. वेळेची कमी असणे, भंगाराचे दुकान माहीत नसणे, भंगारात विक्री करायचे साहित्य वाहून नेण्याची सुविधा नसणे आदी विविध कारणांमुळे दारापर्यंत आलेल्या हातगाडीधारक भंगारवाल्याला त्याची विक्री केली जाते. संबंधित भंगारवाला अनोळखी असतानाही त्याला घरात घेतले जाते. त्याच्याशी व्यवहार केला जातो. याचाच फायदा घेत काही भंगारवाले संबंधित घरांची आणि परिसराची ''रेकी'' करतात. 

पिंपरी-चिंचवड शहरात भंगाराची हजारो दुकानेशहरात भंगाराची हजारो दुकाने आहेत. या व्यावसायिकांकडून परप्रांतियांना हातगाड्या उपलब्ध करून दिल्या जातात. हे परप्रांतिय हातगाडी घेऊन गल्लीबोळात फिरून भंगार खरेदी करतात. एका व्यावसायिकाकडे किमान आठ ते दहा हातगाडीवाले परप्रांतिय असतात. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत हे परप्रांतिय गल्लीबोळात हातगाडी घेऊन फिरतात व भंगार खरेदी करतात. 

परप्रांतियांची पोलिसांना नाही माहिती भंगाराचा व्यवसाय करणाऱ्यांपैकी बहुतांश व्यावसायिकांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे दिसून येते. तसेच त्यांच्याकडे असलेल्या परप्रांतियांचेही ओळखपत्र किंवा त्यांच्याबाबतची पूर्ण माहिती या व्यावसायिकांना नसते. त्यामुळे कोणता परप्रांतिय नेमका कोठून आला आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, याबाबत व्यावसायिकांकडे माहिती उपलब्ध होत नाही. तसेच शहरात भंगाराचे किती व्यावसायिक आहेत. गल्लीबोळात फिरणारे भंगारवाले किती आहेत, याबाबत पोलिसांकडेही माहिती नाही. भंगाराच्या व्यावसायिकांकडून त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात येत नाही.

आर्थिक उलाढालीची नोंद नसल्याने गुन्हेगारीचा शिरकावभंगाराच्या व्यवसायात रोख स्वरुपात व्यवहार होतात. त्याच्या नोंदीबाबत बहुतांश भंगारवाले उदासीन आहेत. मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने या व्यवसायात गुन्हेगारीचा शिरकाव आहे. हातगाडीधारक काही भंगारवाले वस्तू चोरून त्याची भंगारात विक्री करीत असल्याचे प्रकार वेळोवेळी समोर येतात.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड