शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘अनधिकृत’वर शास्तीकर;  दीड लाख मिळकतधारक रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 04:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता द्या, अनधिकृत बांधकामे नियमित करून शास्तीकर शंभर टक्के माफ करू, असे आश्वासन देणा-या भाजपाने आपला शब्द फिरविला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता द्या, अनधिकृत बांधकामे नियमित करून शास्तीकर शंभर टक्के माफ करू, असे आश्वासन देणा-या भाजपाने आपला शब्द फिरविला आहे. त्यामुळे सुमारे दीड लाख मिळकतधारकांना शास्तीकराची रक्कम भरावी लागणार आहे. ही वसुली थांबवावी, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे. शास्ती वसुलीला विरोध दर्शविला.पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरून राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस त्यानंतर आता सत्तेत आलेल्या भाजपानेही राजकारण केले आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे साडेचार हजार मिळकती आहेत. श्रेयवादासाठी भाजपाने महापालिका निवडणुकीपूर्वी शास्तीबाबत अध्यादेश काढून गाजर दाखविले. अनधिकृत बांधकामे नियमित होण्याची प्रक्रिया सुरू असताना शास्तीची वसुली महापालिकेने सुरू केली आहे. सहाशे चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना शास्ती नाही़ त्यानंतर शास्ती असा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे शास्ती माफ करण्याच्या आश्वासनाचा भाजपाला विसर पडला आहे.अनधिकृत बांधकामांवर २००८ पासून लागू करण्यात आलेली शास्ती रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली. मात्र, शास्ती रद्द करता येत नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर प्रशासनाने वसुली सुरू केली आहे. शास्तीबाबत महापालिकांनी धोरण निश्चित करावे, असे शासनाने सुचविले होते. त्यावर २० एप्रिलच्या सभेत याविषयीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. शासनाचे आदेश मिळाल्यानंतर यापुढील शास्तीत माफी देण्यात आली असून, कर भरायला गेल्यानंतर नागरिकांकडून सुरुवातीला शास्ती वसूल केली जात आहे. महापालिकांनी शास्ती वसूल करू नये, अशी मागणी सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून होत आहे.नेत्यांच्या निष्क्रियतेचा नागरिकांना भुर्दंडअनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. असे असताना महापालिका चुकीच्या पद्धतीने शास्ती वसूल करीत आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी या प्रश्नाचे भांडवल करून निवडणुकीत यश मिळविले. आरोप आणि प्रत्यारोपातच धन्यता मानली आहे. सत्ताधाºयांच्या निष्क्रियतेमुळे शास्तीकराचा भूर्दंड नागरिकांनी भरावा लागत आहे. ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार शास्ती संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकांना आहे. त्यामुळे सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.