शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

आवक घटल्याने गवार, हिरवी मिरची, आले महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 00:22 IST

पिंपरी मंडई : भाज्यांच्या दरामध्ये वाढ; बटाटा, कांद्याचे दर स्थिर

पिंपरी : येथील लाल बहाद्दूर शास्त्री भाजीमंडईत रविवारी भाज्यांची आवक कमी झाली. त्यामुळे बहुतांश भाज्यांचे दर तेजीत होते. आल्याची आवक कमी झाल्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यामध्ये आले ७० रुपये किलो होते. या आठवड्यात त्यामध्ये वाढ होऊन त्याचे दर ९० ते १०० रुपये किलो झाले आहेत.

हिरवी मिरची, भेंडी व गवारची आवक कमी झाल्यामुळे त्यांचे भाव वाढले आहेत. टोमॅटोचीही आवक कमी झाली आहे. वाटाण्याच्या भावामध्ये वाढ होऊन वाटाणा ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. दोडका, घोसाळी, पडवळ, पावटा यांच्या दरामध्येही वाढ झाली आहे. हिरवी मिरची महाग झाली असून, त्याची ७० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत होती. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याचे भाव १० ते १२ याप्रमाणेच आहेत. बटाट्याचे दर स्थिर असून, त्यांची १२ ते १५ रुपये किलो दराने विक्री सुरू होती. वांगी, फ्लॉवर, शिमला मिरची, गवार यांचेही भाव वाढले आहेत. उन्हाच्या झळा जाणवू लागण्याने काकडी व लिंबाला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. काकाडीची ४० ते ४५ रुपये तर लिंबू २०० रुपये शेकडा याप्रमाणे विकले जात होते.

फळबाजारामध्ये हापूस, बदाम आणि लालबाग आंबा दाखल झाला आहे. हापूस आंबा ५०० ते १००० रुपये डझन, बदाम आंबा ७० ते १०० व लालबाग आंबा ८० ते १०० रुपये किलो दराने विकला जात आहे.

पालेभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणेकोथिंबीर : १० ते १५, मेंथी : १५, शेपू : १० ते १५, पालक : १० ते १५, मुळा : २०, कांदापात : १०, तांदुळजा : १०, पुदिना : ५.फळांचे भाव पुढीलप्रमाणे :सफरचंद : १६०, पेरू : ४० ते ६०, पपई : ३०, डाळींब : ८०, मोसंबी : ६० ते ८०, संत्री : ६० ते ८०, किवी : १०० (८ नग) , ड्रॅगन फ्रुट : १०० (१ नग) , पिअर : १२० ते २००, द्राक्षे : १२० (सफेद), १६० ते २२० (काळे), १२० ते २०० (बदाम), १६० ते २०० (लालबाग), आंबे : ५०० ते १०००(हापूस) डझन.फळभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर (प्रतिकिलो)४बटाटे : १४ ते १५, कांदे : १२ ते १५, टोमॅटो : २० ते २५, गवार : ८० ते ९०, दोडका : ७०, घोसाळी : ६०, लसूण : ८०, आले : ९० ते १००, भेंडी : ६०, वांगी : ४०, कोबी : ४०, फ्लॉवर : ३०, शेवगा : ४०, हिरवी मिरची : ७० ते ९०, शिमला मिरची : ५५, पडवळ : ४०, दुधी भोपळा : ४०, लाल भोपळा : २०, काकडी : ४०, चवळी : ५०, काळा घेवडा : ७० ते ८०, तोंडली : ५०, गाजर : २५, वाल : ६०, राजमा : ७०, मटार : ५० ते ६०, कारली : ६०, पावटा : ७०, श्रावणी घेवडा : ९० ते १००, लिंबू : २०० (शेकडा)

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड