शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणे विकसित करणार, सांगवीत होणा-या शरीरसौष्ठव स्पर्धा खर्चास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:25 IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, तसेच इंडियन बॉडी बिल्डिंंग फेडरेशन यांच्या मान्यतेने सांगवी येथे महापौर चषक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०१७ आयोजित करण्यास व त्यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास, तसेच घरकुलातील आरक्षण विकासास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, तसेच इंडियन बॉडी बिल्डिंंग फेडरेशन यांच्या मान्यतेने सांगवी येथे महापौर चषक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०१७ आयोजित करण्यास व त्यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास, तसेच घरकुलातील आरक्षण विकासास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.स्थायी समिती सभागृहातील सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. चिखली से. क्र. १७ व १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या गृहप्रकल्पामध्ये विविध आरक्षणे विकसित करण्यासाठी येणाºया सुमारे ७६ लाख ५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यांपैकी महापालिकेच्या नि:समर्थ (अपंग) कल्याणकारी योजनेअन्वये मनपा हद्दीतील अपंग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य देण्यात येते.त्यानुसार दोन पात्र लाभार्थींना देण्यात येणाºया सुमारे दोन लाखांच्या अर्थसाहाय्यास मान्यता दिली. महानगरपालिका जलशुद्धीकरण केंद्र से. क्र. २३ येथे जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी द्रवरूप स्वरूपातील पॉली अ‍ॅल्युमिनियम क्लोराइड व पावडर स्वरूपातील पॉली अ‍ॅल्युमिनियम क्लोराइड पुरविण्यासाठी ४६ लाख १६ हजार रुपायांच्या खर्चास, प्रभाग क्र. ३४ गव्हाणेवस्ती येथे मनपा इमारतीची सुधारणा करण्यासाठी येणाºया सुमारे ३१ लाख ८६ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत ताम्हाणेवस्ती परिसरातील जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी येणाºया सुमारे ३३ लाख ३५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. फुगेवाडी पंपिंग स्टेशन अंतर्गत येणाºया जुन्या मलनि:सारण नलिका आवश्यक त्या ठिकाणी बदलण्यासाठी येणाºया सुमारे ३६ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.प्रभाग १८ मध्ये फुटपाथसाठी ३३ लाखप्रभाग क्र. १८ मध्ये फुटपाथची कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३३ लाख रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. २५ मध्ये फुटपाथची कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३१ लाख ४७ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. २४ मध्ये फुटपाथची कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३० लाख ३१ हजार रुपयांच्या खर्चास, आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत से. क्र. २२ परिसरातील जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी येणाºया सुमारे ३१ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. चºहोली व चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत शेलारवस्ती, पाटीलनगर, धर्मराजनगर परिसरातीलजुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी येणाºया सुमारे ३५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड