दौंड : रावणगाव येथे दुचाकी व बैलगाडीच्या अपघातात चालक सत्यजित शिंदे (वय २०, रा. धायगुडेवाडी, बोरीपार्धी) याचा जागीच मृत्यू झाला. शिंदे हा रावणगावच्या दिशेने निघाला होता. यावेळी रावणगावजवळील शिवचीआई मंदिराजवळ त्याची दुचााकी बैलगाडीला धडकली. यात तो गंभीर जखमी झाला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय माने यांनी दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रावणगावला दुचाकी -बैलगाडीचा अपघात; १ ठार
By admin | Updated: October 15, 2016 05:49 IST