शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: नदीत राडारोडा टाकणे महागात, नऊ वाहनांवर कारवाई

By विश्वास मोरे | Updated: March 28, 2024 16:01 IST

सापळा रचून नऊ वाहनांवर कारवाई करून सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे....

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीत राडारोडा टाकला जात आहे, याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार शहरातील नद्यांच्या कडेला तसेच नद्यांमध्ये राडारोडा टाकणारी वाहने आणि वाहनचालकांवर पर्यावरण  विभागाने दंडात्मक कारवाई करण्यात आली. सापळा रचून नऊ वाहनांवर कारवाई केली. सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरातून मुळा, पवना आणि इंद्रायणी नद्या वाहतात. या नद्यांच्या कडेला राडारोडा टाकत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत. तसेच लोकमतनेही वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत महापालिकेच्या पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली. सापळा रचून नऊ वाहनांवर कारवाई केली. सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे.  

ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पोवर कारवाईशहरातील विविध भागांत दररोज ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो तसेच आर.एम.सी.प्लॅन्टच्या मिक्सर गाड्या अशा वाहनांतून  नदीच्या कडेला राडारोडा टाकण्यात येत होता.  यामध्ये वाहनचालक  शिवा राठोड (वाहन क्र.के.ए.३३/टी.बी.२३२२), उमेश बारणे (वाहन क्र.एम.एच.१४/जे.एल.९०८५), वेदांत देसाई (वाहन क्र.के.ए.३३/के.ए.२१०५), आर.डी.वाघोले (वाहन क्र.एम.एच.१४/डी.एम.६४३२, एम.एच.१२/टी.एल.०८७२), तेजस उक्के (वाहन क्र.एम.एच.२०/सी.आर.२१९१,/एम.एच.१४/एल.ए.८३२८), प्रकाश चौधरी (वाहन क्र. एम.एच.१२/क्यु.डब्ल्यु.११४१), कांतीलाल खिरु पवार (वाहन क्र. एम.एच.१४/बी.एम.९८२) अशी एकूण ९ वाहने पकडून त्यांच्याकडून सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा  दंड वसूल केला.

या पथकाने केली कारवाईआयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, गोरक्षनाथ करपे, स्वप्निल पाटील, पुष्पराज भागवत, प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे तसेच महाराष्ट्र सुरक्षा दल, मेस्को जवानांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

नदीपात्रात भराव टाकल्यामुळे नदीपात्र अरूंद होत असून तसेच नदीप्रदूषण देखील होत आहे. त्यामुळे यापुढे नदीपात्रात भराव टाकणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या कारवाईसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.  नदीमध्ये भराव टाकणाऱ्या जागामालक, गाडी मालक, वाहन चालकांवर  दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच वाहनेही जप्त करण्यात येतील, याची नोंद सबंधितांनी घ्यावी.

-संजय कुलकर्णी (सह शहर अभियंता,  महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभाग)

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका