शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी पुलावरील सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:31 IST

आंदर मावळातील सुमारे ४० गावांना जोडणाऱ्या टाकवे-कान्हे जवळील इंद्रायणी नदी पुलावरील पुलाचे सुरक्षारक्षक खांब तुटले असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, तातडीने सुरक्षारक्षक खांबांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

कामशेत : आंदर मावळातील सुमारे ४० गावांना जोडणाऱ्या टाकवे-कान्हे जवळील इंद्रायणी नदी पुलावरील पुलाचे सुरक्षारक्षक खांब तुटले असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, तातडीने सुरक्षारक्षक खांबांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.मागील काही दिवसांपूर्वी या पुलावरून टाकवे औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीची बस या सुरक्षारक्षक खांबांना धडकून मोठा अपघात झाला होता. या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले असून, येथे मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. इंद्रायणी नदीच्या या पुलावर वाहनचालकांची गैरसोय होत असल्यामुळे सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सुरक्षारक्षक सीमा निश्चित करावी, याकरिता रेडियम पट्टी लावण्यात आली आहे.आंदर मावळमधील नागरिकांना हा पूल एकमेव दळणवळणाचे साधन आहे. काही वर्षांपासून आंदर मावळ परिसराचे दिवसेंदिवस विस्तारीकरण होत आहे. या भागात औद्योगिक वसाहती बरोबरच गृहप्रकल्पासाठी या भागात अनेक व्यावसायिक उद्योजक गुंतवणूक करत आहेत.कान्हे व आंदर मावळला जोडणाºया या पुलाची रुंदी कमी असल्याने औद्योगिक वसाहतीतील मालवाहतूक वाहनांना मोठी अडचण होत आहे. तर मोठ्या गाड्या पुलावरून जात असताना एक साईटवरील वाहतुकीचा वेग चालकांना कमी करावा लागतो. यामुळे कित्येकदा पुलावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसत आहे. नवीन पुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या आंदर मावळ नागरिकांसाठी इंद्रायणी पुलाच्या सुरक्षेसाठी तरी योग्य उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, हीच सध्यातरी एकमेव अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाindrayaniइंद्रायणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड