शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मावळातील धरणांची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:07 IST

पवनानगर : मावळात पवना, वडिवळे, आंद्रा, भुशी, वलवण या धरणांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहणीत दिसून आले. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने धरणपरिसर दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे तालुक्यातील सर्वांत मोठे धरण असून धरण परिसरात राज्य व परराज्यातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. परंतु, ...

पवनानगर : मावळात पवना, वडिवळे, आंद्रा, भुशी, वलवण या धरणांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहणीत दिसून आले. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने धरणपरिसर दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे तालुक्यातील सर्वांत मोठे धरण असून धरण परिसरात राज्य व परराज्यातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. परंतु, याठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची यंत्रणा नसल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे पवना धरणाचे अधिकारी व कर्मचारी काणाडोळा करताना दिसत आहेत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी धरणाच्या पवना विद्युत वीज केंद्रात एका व्यक्तीने पाणी सोडण्याच्या गेटचे बटन दाबल्याने गेट खाली पडले.धरण क्षेत्रात परिसरातील अनेक तरुण वर्ग सायंकाळच्या वेळी मद्यपान करण्यासाठी धरणाच्या कडेला व धरणाच्या दरवाजाजवळच बसले असतात. तर काही जण पवनानगर येथील विश्रामगृहाच्या कट्यावर बसून मद्यपान करत असतात. धरणाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्याठिकाणी मद्यपान करून काचा फोडणे त्यामुळे परिसरातील शेतकºयांना शेतावर जाताना मोठी दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ आजही अशा घटना घडत आहेत. पवना वीज केंद्राच्या गेटवर सुरक्षारक्षक नसल्याने स्थानिक लोक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर सायंकाळीच्या वेळी आतमध्ये प्रवेश करून मद्यपान करताना दिसतात. वीज केंद्राच्या आत जाण्यासाठी हे मुख्य गेट आहे तरी त्या ठिकाणी कोणताही सुरक्षारक्षक नसतो. धरण परिसरात पाणी सोडण्याच्या दरवाजाजवळ मोठ्या प्रमाणावर गवताचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे. धरण परिसरात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण अशा मोठमोठ्या शहरांतील बिल्डर, राजकीय नेते, अभिनेते, अशा उद्योजकांचे बंगले व फार्म हाऊस असून, या ठिकाणी दर शनिवारी व रविवारी बेकायदारीत्या पार्टीचे नियोजन केले जाते. काही वर्षांपूर्वी याच भागात मोठी रेव्ह पार्टी करताना काही लोकांना पकडले होते. तर अशा प्रकारांना जबाबदार कोण, असा स्थानिक पातळीवर संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.धरणाच्या अनेक वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा भिंत नाही. धरणातील बेकायदा पाणीउपसा होत आहे, तरीदेखील अधिकारी गप्प का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असल्याचे दिसून येत आहे.पवना धरण परिसराच्या सुरक्षेसाठी आम्ही जागोजागी सुरक्षिततेचे फलक लावले आहे. धरणाच्या दरवाजाजवळ दोन बंदूकधारी कर्मचारी नेमण्यासाठी नियोजन केले आहे. पवना धरण परिसरात बोट सुरू असलेल्या सर्व परवानाधारक बोटधारकांना परवाना देताना नियम व अटी घालून दिल्या आहेत.- मनोहर खाडे, शाखा अभियंता, पवना धरण