शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे नगरसेवक पद धोक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 18:00 IST

भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात यावी, या बाबतचा अहवाल २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत सादर करावा. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले आहेत.

ठळक मुद्दे बनावट कुणबी जात दाखल्याआधारे लढवली निवडणूक ?भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे नगरसेवक पद धोक्यात?

पिंपरी : भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात यावी, या बाबतचा अहवाल २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत सादर करावा. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले आहेत. अशी माहिती याचिकाकर्ते  कैलास कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली. 

     महापालिकेत सद्या महापौर बदलाचे वारे वाहू लागले असून शत्रुघ्न काटे महापौरपदाचे दावेदार आहेत. मात्र त्यांच्यापुढे जात प्रमाणपत्राच्या प्रकरणाने अडचण निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रहाटणी-पिंपळे सौदागर (प्रभाग क्रमांक २८) मधून ओबीसी राखीव प्रवर्गातून शत्रुघ्न काटे यांनी भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आहे. मात्र, बनावट कुणबी दाखल्याच्या आधारे त्यांनी निवडणूक लढविल्याबद्दल बाळासाहेब काकरे तसेच कैलास कुंजीर यांनी आक्षेप नोंदवला. तसेच याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली. दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणीत जात पडताळणी समितीने काटे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करावी, दक्षता कमिटीमार्फत आवश्यक त्या कागपत्रांची  छाननी आणि चौकशी करून अहवाल सादर करावा. असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आदेश न्यायाधीश रियाज छागला व ए. एस. ओक यांच्या खंडपीठाने दिले आहेत. जात पडताळणीसंदर्भात न्यायालयीन निर्णयावरच त्यांचे महापौरपदाचे भवितव्य ठरवणार आहे. शत्रुघ्न काटे हे महापौरपदाचे दावेदार असून, त्यांच्यापुढे जात प्रमाणपत्रामुळे अडचण निर्माण झाली आहे. येत्या ३ जुलैला जात पडताळणी समितीला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCaste certificateजात प्रमाणपत्रBJPभाजपाPoliticsराजकारण