शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पॅनकार्डव्दारे क्रेडीट कार्ड मिळवून पाच लाखांची खरेदी करत फसवणूक;वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:25 IST

आरोपीने फिर्यादी यांच्या नावे बनावट पॅनकार्ड तयार केले. त्याचा वापर करून एका बँकेचे क्रेडीट कार्ड मिळविले..

पिंपरी : बनावट पॅनकार्ड तयार करून त्याच्या आधारे क्रेडीट कार्ड मिळविले. त्यावरून पाच लाख रुपयांची खरेदी करून फसवणूक केली. सप्टेंबर २०१९ ते ६ डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला.लोकशकुमार महेशकुमार डिमोले (वय ४०, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १७) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांच्या नावे बनावट पॅनकार्ड तयार केले. त्याचा वापर करून एका बँकेचे क्रेडीट कार्ड मिळविले. त्याव्दारे पाच लाख रुपयांची खरेदी करून फिर्यादी यांची फसवणूक केली.दरम्यान, फिर्यादी यांना याबाबत काही माहिती नव्हती. मात्र बँकेतून त्यांना फोन आला. क्रेडीट कार्डवर खरेदी केल्याचे पैसे भरा, असे बँकेतून त्यांना सांगण्यात आले. मात्र क्रेडीट कार्ड काढलेच नाही, तर खरेदी कशी करणार, असा प्रश्न फिर्यादी यांनी उपस्थित केला. त्यानंतरही बँकेच्या संबंधित विभागाकडून फिर्यादी यांना पैशांसाठी फोन येत होते. त्यामुळे त्यांनी बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन क्रेडीट कार्ड विभागात याबाबत विचारणा केली. त्यावेळी क्रेडीट कार्डसाठीचा अर्ज, पॅनकार्ड आदी कागदपत्रे फिर्यादी यांना दाखविण्यात आली. मात्र त्यावर फिर्यादी यांची सही नसून ती बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फोटो देखील दुसऱ्याचा वापरून कार्ड मिळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या नावे बनावट पॅनकार्ड तयार करून त्याव्दारे क्रेडीट कार्ड मिळवून आरोपी याने फसवणूक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र मुदळ तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसbankबँकfraudधोकेबाजी