शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:55 IST

रुपाली काळे : नागरिकांना मिळेना सुविधा

आळंदी : आळंदी ग्रामीण रुग्णालयास अनेक समस्यांनी घेरले असून भाविक, नागरिकांना आरोग्यदायी प्रभावी सुविधांसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या रुपाली काळे यांनी केली आहे. या संदर्भात आळंदी ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट देऊन कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटातील नागरिक आणि भाविक यांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देण्याची मागणी केली. आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक जी. जी. जाधव यांचे समवेत त्यांनी संवाद साधला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब ठाकूर आदी उपस्थित होते. आळंदी नगरपरिषदेने आळंदी ग्रामीण रुग्णालयास ५० गुंठे जागा कराराने दिली आहे. या जागेत आळंदी ग्रामीण रुग्णालय विकसित करण्यात आले आहे. मात्र, अनेक आरोग्यदायी सेवासुविधांपासून रुग्णालय वंचित असल्याचे या पाहणी दौऱ्यात निदर्शनात आल्याचे त्यांनी सांगितले. यात येथील रुग्णालयाच्या प्रांगणात आळंदी नगरपरिषदच्या वाहनांसह इतर खासगी बेकायदेशीर वाहन पार्किंग, भाजी विक्रेत्यांचा रुग्णसेवेत अडथळा, अत्याधुनिक जनरेटर सेवेचा अभाव, औषध भांडारसाठी स्वतंत्र कक्षाचा अभाव, एक्स्प्रेस फिडर सुविधेचा अभाव, शवविच्छेदन कक्षाचा अभाव आदी समस्या कायम आहेत. यासाठी काळे यांनी सुसंवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या. या मागण्यांसाठी काळे यांनी थेट माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्यास साकडे घातले आहे.आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने आळंदी ग्रामीण रुग्णालयास सेवासुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. येथील भाविक व नागरिक तसेच कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या आरोग्याचे सेवेसाठी या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढ खास बाब म्हणून देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :AlandiआळंदीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल