शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

उद्योजक घेताहेत राजाश्रय, ठेकेदारांच्या दहशतीमुळे छोट्या व्यावसायिकांनी निवडला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 01:46 IST

कंपनीतील विविध कामांचा ठेका कोणाला द्यायचा हे ठरविण्याचा उद्योजकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती दमदाटीने कंपनीतील कामाचे ठेके स्वत: घेत आहेत.

- संजय मानेपिंपरी  - कंपनीतील विविध कामांचा ठेका कोणाला द्यायचा हे ठरविण्याचा उद्योजकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती दमदाटीने कंपनीतील कामाचे ठेके स्वत: घेत आहेत.हा प्रकार सर्रासपणे पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण, तळेगाव औद्योगिक पट्ट्यात सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदारीत गुंड आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे अशा ठेकेदारीला अप्रत्यक्षपणे राजकीय पाठिंबा मिळत असून, उद्योजक एकाकी पडू लागले आहेत. दहशतीखाली वावरणाऱ्या उद्योजकांना पोलिसांकडूनही संरक्षण मिळण्यात अडचणी येत असल्याने नाइलाजास्तव राजकीय आश्रय घ्यावा लागत आहे.औद्योगिक क्षेत्रात गुंड प्रवृत्तीच्या आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. कारखान्यांमधील ठेकेदारीचा कसलाही अनुभव गाठीशी नसलेले राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते नेत्यांकडे कंपन्यांमधील कंत्राट मिळावे, यासाठी आग्रह धरतात. राजकीय पक्षाचे पद धारण केले असले, तरी उत्पन्नाचे स्रोत कंपनीतील ठेकेदारीच असावे,असे राजकीय पक्षांच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटते.सुरक्षित व्यवसायासाठीराजकीय संपर्क‘उद्योजक, व्यावसायिक म्हटले की, राजकारणापासून चार हात दूर’ असे समीकरण होते. राजकारणी कोणीही असो, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याची भूमिका बाळगून व्यावसायिक स्वत:हून राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत करीत असतात. पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, शिरूर या औद्योगिक पट्ट्यात मात्र अचानक चित्र बदलले आहे. अनेक उद्योजक राजकीय पक्षांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षितपणे व्यवसाय, उद्योग करता यावा, या उद्देशाने उद्योजक राजकीय आश्रयाला येत आहेत.नेतेमंडळींचा उद्योजकांवर दबावनेतेमंडळीकडून उद्योजकांवर दबाव आणून अथवा वशिलेबाजीने कंपनीतील कामाचा ठेका मिळविण्यात यशस्वी झालेले अनेक ठेकेदार औद्योगिक पट्ट्यात कार्यरत आहेत. गुंड ठेकेदार आणि राजकीय दबावतंत्राच्या अवलंबाने ठेकेदारीत शिरकाव केलेल्यांमध्ये ठेका मिळविण्यावरून वादंगाचे प्रकार घडू लागले आहेत. कंपनी मालकाला (उद्योजक) स्वत:च्या मर्जीने ठेकेदार नेमण्याचा अधिकार वापरता येत नाही. उद्योजकाने एखादा ठेकेदार नेमल्यास तो ठेकेदार काम कसे करतो, ते पाहतो, मालवाहू वाहने पुरविण्याचा ठेका इतर कोणी घेतल्यास त्या वाहनांच्या काचा फोडणे, वाहनांचे नुकसान करून ठेकेदाराला पळून लावण्यापर्यंतचे प्रकार औद्योगिक पट्ट्यात घडत आहेत. कामगार पुरविण्याचा ठेका उद्योजकाने दुसºया कोणाला दिला असल्यास त्या ठेकेदाराच्या कामगारांना कंपनीत जाण्यास मज्जाव केला जातो.दादागिरीपुढेउद्योजक हतबलउद्योजकांनी दादागिरी करणाºया ठेकेदारांची पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तर राजकीय नेत्यांकडून पोलीस अधिकाºयाची समजूत काढली जाते. गुंडगिरी करणाºया स्थानिक ठेकेदारांविरुद्ध तक्रार करायची, तर कारखान्याचे नुकसान केले जाण्याची भीती असते. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार करण्यास उद्योजक तयार होत नाहीत. कोणाचीही तक्रार केली, तरी राजकीय नेते, पुढाºयांचा हस्तक्षेप होत असल्याचे कटू अनुभव उद्योजकांना आले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाशी संलग्न राहणे हाच सुरक्षित उद्योग, व्यवसाय करण्याचा पर्याय असल्याचे लक्षात आल्याने हतबल उद्योजक राजकीय आश्रय घेत आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड