शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

फ्लेक्सबाजीला प्रोत्साहन; अधिका-यांची चौकशी, महापौरांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:00 IST

अनधिकृत फ्लेक्स काढणा-या भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांना ठेकेदाराने खंडणी मागणे आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.

पिंपरी : अनधिकृत फ्लेक्स काढणा-या भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांना ठेकेदाराने खंडणी मागणे आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. ‘गुंडगिरी करणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अनधिकृत फ्लेक्स उभारणाºयांस प्रोत्साहन देणा-या अधिका-यांवर कारवाई करावी, त्यांची चौकशी करावी’ असा आदेश महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनास दिला आहे.महापालिका परिसरातील अनधिकृत फ्लेक्सविरोधात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांकडून आवाज उठविला जात आहे. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्वत: अनधिकृत फ्लेक्स काढण्याची मोहीम उघडली होती.त्यामुळे संतापलेल्या ठेकेदाराने कामठे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या विषयावर बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असो; त्याला कोणी दमबाजी करीत असेल तर ते चुकीचे आहे. अशा मुजोर ठेकेदारांवर त्वरित कारवाई करावी, माज असणाºया ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे.’’दत्ता साने म्हणाले, की यापूर्वीही एका ठेकेदाराने असाच दम एका नगरसेवकास दिला होता. नगरसेवकांना कोणी धमकी देत असेल, तर ते प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे. धमकी देणाºयांचा तुम्ही बंदोबस्त करणार नसाल, तर वेळ पडल्यास आम्ही करू.सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘फ्लेक्समुळे शहर बकाल होत आहे. नगरसेवकाला धमकी देण्यापर्यंत मुजोरी वाढली आहे. अशा ठेकेदाराला काम देऊ नये. त्याची मस्ती उतरविली जाईल. प्रशासनाने त्याची मालमत्ता जप्त करावी.’’>ठेकेदाराला काळ्या यादीत टाकाशिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘फ्लेक्स संदर्भात सारथीवर आणि आमच्याकडेही तक्रारी येतात. त्यांची दखल घेतली जात नाही. अशा लोकांना कोण अधिकारी पाठीशी घालतेय याचा शोध घ्यायला हवा. किती फ्लेक्सला परवानगी दिली आहे आणि किती फ्लेक्स विनापरवाना आहेत, याचेही आॅडिट करावे. नगरसेवकांना धमकी देणाºयांना काळ्या यादीत टाकावे.’’महापौर नितीन काळजे यांनी, संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, तसेच या प्रकरणाची आणि संबंधित अधिकाºयांची चौकशी करावी, असा आदेश प्रशासनास दिला.अधिकाºयांचे अभयतुषार कामठे म्हणाले, ‘‘सप्टेंबर महिन्यापासून फ्लेक्ससंदर्भात मी महापालिकेकडे तक्रार करीत आहे. प्रशासनाकडे माहितीही मागितली. बीट निरीक्षकांकडे तक्रारही केली. संबंधित विभागाच्या अधिकाºयालाही सांगितले. मात्र, दखल घेतली नाही. दखल न घेतल्याने आंदोलन केले होते.’’