पिंपरी - लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची चळवळ समाज संघटनासाठी होती. गणेशोत्सव मंडळांकडून तोच विधायक वारसा जोपासला जात आहे़ त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. चिंचवड येथील आॅटो क्लस्टरमध्ये झालेल्या या बक्षीस वितरण समारंभास पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नम्रता लोंढे, नगरसदस्य उत्तम केंदळे, सागर हिंगणे, दिनेश यादव, परीक्षण समितीचे सदस्य नंदकुमार सातुर्डेकर, श्रावण जाधव व पुरुषोत्तम शेलार आदी उपस्थित होते.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २०१७ मध्ये गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. तथापि न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेस बक्षीस वितरण करता आले नाही. महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुढाकार घेऊन स्वनिधीतून विजेत्या गणेशोत्सव मंडळांची बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला होता. पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी भाजपाची सत्ता आल्यानंतर गणेश मंडळांच्या बक्षिसाची रक्कम पहिल्या क्रमांकासाठी ३१वरून ५१ हजार केली. न्यायालयीन आदेशामुळे बक्षीस वितरणास अडचण निर्माण झाली. तथापि गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला.’’विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने म्हणाले, ‘‘वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बक्षीस वितरणाची परंपरा खंडित झाल्याने मी गणेश मंडळांना बक्षिसे मिळण्यासाठी आंदोलन केले.लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी समाज एकत्रित करण्यासाठी हा उत्सव सुरू केला. गणेश मंडळांमार्फत कार्यकर्ते घडले जातात़ त्यातून मीही घडलेलो आहे. एखाद्या मंडळाला ही चळवळ सुरू ठेवण्याकरिता किती कष्ट करावे लागतात, याची जाणीव असल्याने महापालिकेच्या निधीतून बक्षीस वितरण करणे न्यायालयीन निर्णयानुसार शक्य नसल्याने आपण स्वखर्चातून या मंडळांना बक्षिसे देऊ शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. राहुल जाधव, महापौर
विधायक उपक्रमांना प्रोत्साहन आवश्यक - राहुल जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:37 IST