शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पिंपरी चिंचवड महापालिका ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अंजली भागवतने जाणून घेतल्या सोसायट्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:52 IST

प्रत्येक घटकाने एक पाऊल पुढे टाकत सार्वजनिक स्वच्छतेमध्ये भाग घेऊन आपले सामाजिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांनी केले.

ठळक मुद्देवाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्ता व परिसरांतील सोसायट्यांना दिली भेटपरिसर स्वच्छ राखण्याकरिता जनजागृती करणे आवश्यक : मिलिंद पाटील

पिंपरी-चिंचवड (वाकड) : स्वच्छतेसाठी केवळ महापालिका प्रशासनावर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने एक पाऊल पुढे टाकत सार्वजनिक स्वच्छतेमध्ये भाग घेऊन आपले सामाजिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांनी केले.वाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्ता व परिसरांतील सोसायट्यांना नगरसेवक तुषार कामठे यांच्यासह भेट देत स्वच्छतेची पाहणी त्यांनी केली, त्या वेळी त्या बोलत होत्या. पद्मावती धारा येथील पदाधिकाऱ्यांशीही स्वच्छतेविषयी सखोल चर्चा केली. पद्मावती धाराचे अध्यक्ष मिलिंद पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लालगुणकर, मंदार भागवत, सचिन कणसे, उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, खजिनदार राहुल गोरे, मनोहर पाटील, सचिव उत्कर्ष कवाडिकर, कुलदीप सिंग इत्यादी सभासदांनी सहभाग घेतला.यावेळी परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. या चर्चेमध्ये परिसरात नियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण, वाहतूककोंडी, अनधिकृत फलक व इतर विषय हताळण्यात आले. नगरसेवक तुषार कामठे यांनी पाणीगळती थांबविण्याचे काम महापालिकेने हाती घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रभागातील नविन उपक्रम व योजना यांची माहिती नागरिकांना दिली. अध्यक्ष मिलिंद पाटील म्हणाले, की परिसर स्वच्छ राखण्याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच चांगल्या आणि निरोगी आयुष्याकरीता केवळ घराची स्वच्छता पाळून चालणार नाही, तर आपण जेथे वास्तव्य करतो तो संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे ही काळाची गरज आहे, असे नमूद केले. वाकड येथील कल्पतरू चौक, वाकड-हिंजवडी रस्त्याचा काही भाग व पद्मावती धारा येथे उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून स्वच्छता अभियान नियमित राबविण्यात येतो. हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या रविवारी राबविण्याचा संकल्प सर्व सभासदांनी केला आहे, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लालगुणकर यांनी जाहीर केले. पालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी स्पर्धांमध्ये पद्मावती धारा येथील सभासदांचा भाग घेण्याचा मानस आहे. त्याकरीता अशोक लालगुणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीमध्ये एक समिती घटित करून व अंजली भागवत यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक तुषार कामठे यांच्या मदतीने पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे अध्यक्ष मिलिंद पाटील व खजिनदार राहुल गोरे यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड