शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

पाणी योजनेस प्राधान्य

By admin | Updated: May 31, 2017 02:05 IST

शहराचा वाढता विस्तार पाहाता ७३ कोटींची भुयारी गटार योजना आणि ६४ कोटींची नवीन इंद्रायणी पाणीपुरवठा योजना

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : शहराचा वाढता विस्तार पाहाता ७३ कोटींची भुयारी गटार योजना आणि ६४ कोटींची नवीन इंद्रायणी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाईपर्यंत इतर कोणत्याही मोठ्या खर्चाच्या योजनेवर खर्च न करण्याचा ठराव नगर परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण  सभेत बहुमताने मंजूर करण्यात  आला. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पटलावर ८० विषय होते. उपनगराध्यक्ष सुनील शेळके, मुख्याधिकारी वैभव आवारे व्यासपीठावर उपस्थित होते.सत्ताधारी पक्षातर्फे शेळके यांनी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज असल्याचा विषय मांडताना भुयारी गटार योजना आणि नवीन पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी विषय मांडला. येत्या डिसेंबरअखेर दोन्ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी शहरातील डीपी रस्त्यांच्या मोठ्या खर्चाच्या कामांना फाटा देण्याबाबचा ठराव मंजूर करण्यात आला.बांधकाम विभागांतर्गत २३ विषयांमधे पाण्याची टाकी, उद्यान सीमा भिंत, रस्ते दुरुस्ती, सांडपाणी निचरा, स्पीड ब्रेकर्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी वतननगरात सभागृह, व्यायामशाळा तसेच कडोलकर कॉलनीत बेटी बचावो-बेटी पढाओ शिल्प, घोरावाडी रेल्वे रस्त्याचे रुंदीकरण, ढोरवाड्यातील समाज मंदिर दुरुस्ती आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.उद्यान विभागाच्या १४ विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात महिलांसाठी जीम, सुशोभीकरण, विद्युत कामांचा समावेश आहे. विद्युत विभागातील २६ विषयांनाही मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागांतर्गत मोरखळा कचरा डेपोतील कचऱ्याचे निर्मूलन करणे, स्टेशन आणि गाव भागात पेट बॉटल क्रशिंग मशिन लावणे आणि रोटरी क्लब सिटीसाठी पाच स्वच्छतागृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या ठरावास एकमताने मंजुरी देण्यात आली. सभागृह नेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्ष नेत्या हेमलता खळदे, ज्येष्ठ नगरसेविका सुलोचनाताई आवारे, अरुण माने, संतोष भेगडे, अरुण भेगडे, संदीप शेळके, सचिन टकले, शोभा भेगडे, नीता काळोखे, मंगल भेगडे, संध्या भेगडे, अमोल शेटे, विभावरी दाभाडे, वैशाली दाभाडे, कल्पना भोपळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. नगररचना : मैला शुद्धीकरण प्रकल्पासाठी आरक्षणनगररचना विभागातील विषयात यशवंतनगरातील गोल मैदानास एक्रिलीक कमान करून त्यावर गोळवलकर गुरुजी असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मैला शुद्धीकरण प्रकल्पासाठी विठ्ठल मंदिर संस्थानाची सर्व्हे नं. ६५ वरील तीन एकर जागा आरक्षित करण्याचा विषय पुढील कौन्सिल सभेच्या निर्णयासाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषद कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत चर्चा झाली.