शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा आणि लष्करी सेवेचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:42 IST

राहुल जाधव : मुरलीकांत पेटकर यांचा घरी जाऊन सन्मान

पिंपरी : महापौर राहुल जाधव यांनी लष्करी सेवा करणारे खेळाडू मुरलीकांत पेटकर यांची भेट घेऊन कार्याचा गौरव केला. महापालिकेच्या वतीने सत्कार केला. ‘देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या लष्करी अधिकाºयास, खेळाडूचा महापालिकेला सार्थ अभिमान असून, त्यांच्या अनुभवाचा उपयोग खेळाडू घडविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

दिवाळीच्या दिवशी खेळाडू आणि लष्करातील सेवेत योगदान देणाºया पेटकर यांच्या काळेवाडीतील निवासस्थानी जाऊन कार्याचा गौरव केला. विविध पुरस्कार आणि अष्टपैलू कामगिरीचा आढावा घेतला. चर्चा केली. या वेळी कबड्डीतील राष्ट्रीय खेळाडू नीलेश लोखंडे, योगेश सासवडे उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, ‘‘पेटकर यांनी हाइडलबर्ग जर्मनी येथे १९७२ मध्ये पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत व्यक्तिगत सुवर्णपदक मिळविले होते. त्यांनी ५० मीटर फ्री-स्टाइल पोहण्याच्या स्पर्धेत ३७.३३ सेकंदांमध्ये अंतर पार करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्याच वर्षी त्यांनी अचूक भालाफेक व अडथळ्यांची शर्यत यामध्येही सहभाग घेतला आणि या तीनही स्पर्धांमध्ये ते अंतिम फेरीत पोचले होते. हाँगकाँग इथे १९८२ मध्ये झालेल्या फेस्पिक-क्रीडा स्पर्धेत पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण व कांस्य पदके मिळवली. त्यानंतर टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्येही सहभाग नोंदवून रौप्यपदक मिळविले. इंग्लंडमध्ये झालेल्या अपंगांसाठीच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पेटकर यांनी १४० हून अधिक पदके जिंकलेली आहेत. भारतीय सैन्यात ईएमई विभागामध्ये ते क्राफ्टमन पदावरील खासगी जवान म्हणून कार्यरत होते. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात बंदुकीच्या गोळ्या लागून गंभीर इजा होऊन अपंगत्व आले. महाराष्ट्रातील क्रीडापटूंसाठीचा सर्वोच्च छत्रपती पुरस्कारही त्यांना दिलेला आहे. असा खेळाडू आपल्या शहरात वास्तव्यास आहे.’’देशासाठी खूप मोठे योगदान देणारे देशभक्त आहेत. अभिवादन करण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. अशा दिग्गज खेळाडूंच्या अनुभवाचा उपयोग शहरातील क्रीडा विश्वासाठी करण्यात येणार आहे. शहरातील क्रीडा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर अशा गुणी खेळाडूंचा समोवश क्रीडा धोरणात केला जाणार आहे. याविषयी चर्चा करण्यात आली. महापालिकेतर्फे त्यांचा यथोचित गौरव केला जाईल.- राहुल जाधव, महापौर,

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौर