शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

गरिबांना कडधान्य, डाळींची खरेदी परवडेना; सणासुदीच्या तोंडावर भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:31 IST

गरिबांना डाळींची फोडणी परवडेना...

ठळक मुद्देकडधान्य,डाळींच्या भावात १० ते १५ टक्के वाढपुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील डाळींची आवक लॉकडाऊननंतर ३० ते ४० टक्के झाली कमी

पिंपरी : श्रावणापासून खऱ्या अर्थाने सण-उत्सवाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. त्यामुळे बाजारपेठेत कडधान्य व डाळींची मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने परराज्यातील कडधान्यांच्या वाहतुकीला अडथळा व भाडेवाढ झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे आवक कमी असून, सणासुदीसाठी ग्राहकांची मागणी वाढल्याने चणा, वाटाणा, मटकी, राजमा या कडधान्यांसह तूर व चणा डाळींच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे पहिल्या दोन टप्प्यात बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे ग्राहकांनी कडधान्य व डाळी मिळेल, त्या भावाने खरेदी करून साठा केला. आता कोरोना अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने ग्राहक बाहेर पडत नाही. होलसेल बाजारपेठेपेक्षा जवळच्या किराणा दुकानातून खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे होलसेल बाजारातील कडधान्य व डाळींचे भाव स्थीर असलेतरी किरकोळ विक्रीच्या भावात किलोमागे सरासरी ५ ते १५ रुपयांनी वाढ झाली. 

गरिबांना डाळींची फोडणी परवडेना...श्रावणानंतर सणांसाठी डाळींची खरेदी सुरू आहे. शासनाने मोठ्या प्रमाणात चणा डाळीची खरेदी केली. तरीही गेल्या महिन्यांपासून रेशनवर मिळणारी हरभरा व तूरडाळ बंद आहे. त्यामुळे गोरगरीबांना सणासाठी डाळीला फोडणी देणे परवडत नाही. यंदा पाऊस चांगला झाल्याने डाळींचे उत्पादन वाढेल. मात्र, सध्यातरी बाजारपेठेत ग्राहक येत नसल्याने कडधान्यांची आवक कमी आहे. तूर व चणा डाळीची किरकोळ वाढ वगळता होलसेल बाजारात भाव स्थीर आहेत, अशी माहिती व्यापारी अशिष नहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. --------------------------- ‘‘पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील डाळींची आवक लॉकडाऊननंतर ३० ते ४० टक्के कमी झाली. त्यामुळे सध्या बाजारात क्विंटलमागे चणा डाळ ५०० रुपये आणि तूरडाळीचे भाव ४०० रुपयांनी वाढले आहेत.’’- विजय राठोड, होलसेल व्यापारी. ------------------‘‘श्रावणापासून सणासाठी कोणत्याही डाळी घ्यायचे, तर भाव वाढलेले आहेत. यंदा पाऊस चांगला असतानाही माल मिळत नसल्याचे कारण सांगून किराणा दुकानदार जादा भावाने डाळींची विक्री करीत आहेत. ’’- शारदा शिंदे, चिंचवड गाव. -------------बाजारात कडधान्य व डाळींची आवक कमी आहे. सणासाठी ग्राहकांची मागणी वाढल्याने मूगडाळ वगळता इतर डाळी व कडधान्यांच्या भावात साधारण १० ते १२ टक्के वाढ झाली आहे.- सतीश अगरवाल, किरकोळ व्यापारी. ---------------

कडधान्य, डाळींचे होलसेल, किरकोळ भाव

कडधान्य, डाळींचे होलसेल, किरकोळ भाव (प्रति किलो/रुपये) डाळी/कडधान्य    लॉकडाऊनपुर्वी           किरकोळ तूर डाळ                    ९०                              ९५मूग डाळ                 १०५                             ९५चणा    डाळ             ६०                               ७०हि. वाटाणा             १४०                            १६०पा. वाटाणा             ६८                               ८०चणा                       ५०                               ६५काबुली चणा          ६४                               ८५चवळी                    ७०                               ८०मटकी                    ७४                               ८५राजमा                   ७०                               ८५सोयाबीन               ६०                               ६५

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार