शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मावळात निवडणुकीसाठी सज्जता

By admin | Updated: February 20, 2017 02:45 IST

येत्या २१ फेबुवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी येथील मावळ तहसील कार्यालय सज्ज झाले आहे.

वडगाव मावळ : येत्या २१ फेबुवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी येथील मावळ तहसील कार्यालय सज्ज झाले आहे. कार्यालय परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून करत असलेल्या साफसफाई व उभारलेल्या मांडवामुळे तहसील कार्यालयाला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. गेल्या महिनाभरापासून तहसील कार्यालयात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणत वाढली आहे. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात प्रचंड व्यस्त आहेत. सर्व कर्मचाऱ्यांचा सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारीदेखील रात्री उशिरा तहसील कार्यालयात काम करताना पाहण्यास मिळत आहेत. पाच वाजले, की कार्यालय बंद करून घरी जाण्याची घाई करणारे शासकीय कर्मचारी रात्री उशिरा मतदान पेट्या चेक करणे, याद्या चेक करणे व इतर कामे करताना दिसत आहेत. अतिशय जुन्या असलेल्या महसूल भवन व तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या तिन्ही बाजूला भव्य मांडव घातल्यामुळे तहसील कार्यालय सुशोभीत झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यालयाचा परिसर कर्मचारी स्वच्छ करीत आहेत. कार्यालयाच्या आवारात खड्डे असणाऱ्या ठिकाणी खडी टाकून तेथे सपाटीकरण करण्यात आले आहे. स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी नागरिक व अधिकाऱ्यांना वाहने लावण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी देखील आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तहसील परिसरात मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. गैरप्रकार रोखण्यास पोलिस सज्जनिवडणूक म्हटले, की मतदार राजाची हौसमौज करण्याचा प्रयत्न अनेक उमेदवारांकडून केला जातो. मतदाराला खूश करण्यासाठी उमेदवार कसलीही हयगय करीत नाहीत. अनेक उमेदवार मतदारांना पैसे, भोजन, मद्य, भेटवस्तू देऊन मते फिरविण्याचा किंवा कायम राखण्याचे प्रयत्न करीत असतात. प्रसंगी धाकदपटशा दाखवून मते देण्यास भाग पाडले जाते, असे अनेकदा स्पष्ट झाले आहे. असे प्रयत्न रोखण्यासाठी वडगाव पोलीस सज्ज झाले आहेत. तालुक्यात २९३ पोलीस कर्मचारी , ५४ होमगार्ड व १६ अधिकारी नेमण्यात आले आहेत. भरारी पथकाचा माध्यमातूनदेखील करडी नजर पोलीस ठेवून आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. निवडणूक विभागाचे कर्मचारी व अधिकारीही निवडणूक निकोप वातावरणात व्हावी, यासाठी सज्ज आहेत. (वार्ताहर)११ एसटी बस आरक्षित : प्रवाशांची होणार गैरसोय निवडणुकीसाठी तालुक्यातील २१६ मतदान केंद्रावर मतदान अधिकारी, कर्मचारी, मतदान यंत्रे व साहित्यांची ने-आण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तळेगाव विभागातील ११ एसटी बस ताफा निवडणूक आयोगाने आरक्षित केल्या आहेत. काही बस फेऱ्या आणि मुक्कामाच्या गाड्या तीन दिवस रद्द केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाच गट व पंचायत समितीच्या १० गणासाठी मतदान केंद्रावर मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रत्येक ठिकाणी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने वाडी, वस्ती, गाव याठिकाणी मतदान केंद्राची उभारणी केली आहे.  या मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त, कर्मचारी, मतदान यंत्रे व साहित्याची ने-आण करण्यासाठी तळेगाव आगारातून एसटी बस पुरवल्या जाणार आहेत. याचा परिणाम लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील एसटी बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.तळेगाव आगर व्यवस्थापक तुषार माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगारात ४९ एसटी बस असून यातील १५ बस या राजगुरुनगर येथे निवडणुकीसाठी पाठविण्यात येणार आहेत. ११ बस मावळमध्ये पाठविण्यात येणार आहे.  त्यामुळे मावळ मध्ये १९ फेबुवारी ते २१ फेबुवारी दरम्यान निगडे, महागाव, उकसान, मोर्वे या मुकामाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून, यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.