शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून चिंचवडगावात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:46 IST

चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.

पिंपरी : चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना चिंचवड गाव चापेकर चौक येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आकाश ऊर्फ रायबा तानाजी लांडगे (वय २४, रा. पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.प्रशांत ज्ञानोबा वीर (वय ४४, रा. लक्ष्मीगंधा अपार्टमेंट, पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रणजित बापू चव्हाण (वय २७, वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), स्वप्निल ऊर्फ बाबा मोरे (वय २३, रा भोई आळी, चापेकर चौक, चिंचवडगाव), प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश आणि रणजित यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून भांडणे सुरू होती. मंगळवारी रात्री आकाश दुचाकीवरून जात होता. चापेकर चौकाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याला अडविले. कोयता आणि लोखंडी रॉडने आकाशच्या पायावर आणि कमरेच्या खाली मागील बाजूला वार केले. तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. आरोपी रणजित चव्हाण याच्यावर यापूर्वी ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.