शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडून नेहरुनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल प्रशासनाचा 'पंचनामा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 13:23 IST

पालकमंत्री व शासनाच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले आहे..

ठळक मुद्देशासन व ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव

पिंपरी : शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नेहरुनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये परिचारिकांना वेतन दिले जात नसल्याने महापौर उषा ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. प्रशासनास धारेवर धरत हॉस्पिटलचा पंचनामा केला.‘‘पालकमंत्री व शासनाच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले आहे, अशी टीकाही केली. पुणे जिल्ह्यातुन कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी व कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आण्णासाहेब मगर स्टेडीयम या ठिकाणी राज्य शासन, पीएमआरडीए  यांच्या माध्यमातुन जम्बो रुग्णालयाची उभारणी केली. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णावर उपचार होत आहेत. रुग्णालयासाठी ऑक्सिजन, आवश्यक औषधे, गोळ्या त्याचप्रमाणे सर्व भौतिक सुविधाही उपलब्ध करुन दिल्या. मात्र, शासन व ठेकेदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कोविड काळात, जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या या रुग्णालयातील नर्स व इतर स्टाफ यांना वेतन दिलेले नाही.

जम्बो रुग्णालयातील ठेकेदार व प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बदनामी होत असल्याने चिडलेल्या महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज रुग्णालयास भेट दिली. येथील कारभाराचा पंचनामा केला. प्रशासनास धारेवर धरले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘परिचारिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोट्यावधीचा खर्च करुन सुध्दा कर्मचाऱ्यांचे वेतन देणे राज्य शासनाला जमलेले नाही. या प्रकारास सर्वस्वी पालकमंत्री व शासन जबाबदार असुन शासन व ठेकेदार यांच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले आहे. वास्तविक पाहता या रुग्णालयाच्या निविदेचे काम पीएमआरडीए कडुन करण्यात आले असुन ठेकेदाराला निविदा दिलेली आहे. त्यात शासन व पीएमआरडीए चे लक्ष नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना कोण उघड्यावर सोडत आहे. याचे गुपित उघड झालेले नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMayorमहापौरAjit Pawarअजित पवार