शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विरार पूर्वेतील टपाल कार्यालय बंद

By सचिन धर्मापुरीकर | Updated: March 9, 2018 06:41 IST

- शशी करपवसई : विरार पूर्वेतील टपाल कार्यालय बंद करून पश्चिमेच्या कार्यालयातून कामकाज उरकले जात असल्याने अडीच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या विरारकरांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.या शहरात पूर्व आणि पश्चिमेला दोन टपाल कार्यालये होती. मात्र, इमारत मोडकळीस आल्याने पूर्वेकडील कार्यालय २०१३ साली पश्चिमेच्या कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आले ...

- शशी करपवसई : विरार पूर्वेतील टपाल कार्यालय बंद करून पश्चिमेच्या कार्यालयातून कामकाज उरकले जात असल्याने अडीच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या विरारकरांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.या शहरात पूर्व आणि पश्चिमेला दोन टपाल कार्यालये होती. मात्र, इमारत मोडकळीस आल्याने पूर्वेकडील कार्यालय २०१३ साली पश्चिमेच्या कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आले होते. त्या कार्यालयाचा कार्यभार अद्यापही पश्चिमेकडील कार्यालयातून केला जात आहे. पश्चिमेचे कार्यालय आधीच अपुºया जागेत होते. त्यातील पोस्टमास्तरांच्या लहानशा खोलीतूनच पूर्वेकडील कार्यालयाचे कामकाज रेटले जाते आहे. अवघ्या दोनशे फूटाच्या खोलीत कर्मचारी कसाबसा कार्यभार पार पाडीत आहेत. पूर्वेच्या कार्यालयासाठी एका पोस्टमास्तरसह एक कायमस्वरुपी पोस्टमन, ८ कंत्राटी पोस्टमन, एक मदतनीस काम करीत आहेत.वाढत्या लोकसंख्येमुळे पूर्वेकडील पोस्ट कार्यालयावरचा भारही वाढला आहे. टपाल, स्पीड पोस्ट, पोस्ट बचत खाते, तिकीटे खरेदी, आरटीओची कागदपत्रे, आधार कार्ड अशा कामांचा प्रचंड ताण आहे. त्यासाठी कर्मचारीही अपुरे आहेत. त्याहीपेक्षा याठिकाणची जागा अपुरी असल्याने कार्यालयात कायम गर्दी असते. त्यात कोणत्याही सुविधा नसल्याने कर्मचारी आणि ग्राहकांची गैरसोय होते आहे. पूर्वेकडील कार्यालय बंद करण्यात आल्याने लोकांना पाच-पाच किलोमीटर वरून पश्चिमेकडे यावे लागत आहे. त्यातच अपुरे कर्मचारी आणि जागा यामुळे ताण वाढून कामकाज विस्कळीत झाले आहे. पूर्वेकडील कार्यालय सुरु व्हावे यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार