शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कलाशिक्षकांचे पद धोक्यात

By admin | Updated: May 10, 2017 04:00 IST

विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कला विषयाचा स्वतंत्र समावेश करण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कला विषयाचा स्वतंत्र समावेश करण्यात आला होता. परंतु, शासनाच्या क्रीडा व शिक्षण विभागाने नुकतेच पहिली ते आठवीच्या वर्गाचे परिपत्रक काढून कला विषयांच्या तासिकांना कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुण कमी करण्याचा डाव प्रशासनाने आखला असून, त्याला कलाशिक्षकांनी जोरदार विरोध केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे कलाशिक्षकांना जिकिरीचे होणार आहे़ यापूर्वी कला विषयासाठी स्वतंत्र असणाऱ्या चार तासिकांऐवजी दोनच तासिका ठेवण्यात आल्याने कलाशिक्षकांचे पदच धोक्यात आले आहे. त्यामुळे कलाध्यापकांमध्ये असंतोष पसरला आहे. या परिपत्रकाचा निषेध करीत अध्यापनामध्ये व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कला विषयाच्या तासिका दोनवरून पुन्हा चार करण्यात याव्यात, यासाठी पुणे कलाध्यापक संघाच्या वतीने शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, उपशिक्षण संचालक विद्यापीठ, संचालक, शिक्षणाधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. पहिली ते आठवीसाठी पुन्हा होत्या तशा चार तासिका कला विषयासाठी देऊन कलाध्यापकांसाठी असलेले अन्यायकारक परिपत्रक ताबडतोब शासनाने रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रावण जाधव, सुनील बोरले, बिपीन बनकर, सतीश कवाणे, महिला उपाध्यक्ष हुमेरा शेख, मच्छिंद्र कुसाळकर, संजय शेलार आदी उपस्थित होते.