शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील पोलीस चौकी अडकली ''वन वे '' च्या फेऱ्यात : पार्किंगचीही समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 09:56 IST

पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठ म्हणून या परिसरात दिवसभर वर्दळ असते.

ठळक मुद्देचारचाकी वाहन घेऊन जाताना पोलिसांचीही होतेय कसरत, तक्रारदारांनाही त्रास

नारायण बडगुजर-  

पिंपरी : वन वे अर्थात एकेरी वाहतूक, अरुंद रस्ता, तोही पथारीवाले व विविध विक्रेत्यांनी बळकावलेला आदी अडथळे पार करून पिंपरी येथील पोलीस चौकीला तक्रारदाराला पोहोचावे लागते. यात खुद्द पोलिसांची चारचाकी वाहने अडकून पडतात. तर सामान्यांचे काय?     पिंपरी पोलीस ठाण्यांतर्गत पिंपरीतील रेल्वे स्टेशनसमोर पिंपरी पोलीस चौकी आहे. या चौकीच्या पाठीमागे इंदिरा गांधी उड्डाणपूल आहे. या पुलाखाली फळविक्रेते असतात. तसेच चौकीच्या संरक्षक भिंतीला लागूनही काही विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असते. त्यामुळे पोलीस चौकीत चारचाकी वाहन घेऊन जाता येत नाही.    पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठ म्हणून या परिसरात दिवसभर वर्दळ असते. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाकडून येणारी वाहने कराची चौकापासून रिव्हररोडकडे वळतात. एकेरी वाहतूक असल्याने या वाहनांना शगुन चौकाकडे प्रवेश बंदी आहे. कराची चौकापासून दोनशे मीटरवर पोलीस चौकी आहे. मात्र चारचाकी वाहनांना कराची चौकातून रिव्हररोड, भाटनगर मार्गे इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौक तेथून रेल्वे स्टेशन रोडवरून पिंपरी पोलीस चौकीत पोहोचता येते. दोनशे मीटर अंतरासाठी दीड ते दोन किलोमीटर अंतराचा वळसा घेऊन वाहनचालकांना चौकीला जावे लागत आहे. तसेच साई चौकातून चौकीला जायचे असल्यास रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या अरुंद रस्त्याने जावे लागते. हा रस्ता अरुंद असल्याने चारचाकी वाहनचालकांना येथे कसरत करावी लागते. सर्वसामान्यांना चारचाकी वाहन चौकीपर्यंत घेऊन जाणे शक्य होत नाही. चारचाकी वाहनांना इंदिरा गांधी उड्डाणपुलाशिवाय पर्याय नाही. पुलाला लागून भाजीमंडईजवळ स:शुल्क पार्किंग आहे. येथे चारचाकी वाहने पार्क करून नागरिकांना पोलीस चौकीपर्यंत जावे लागते. मात्र बहुतांशवेळा या पार्किंगमध्ये जागा उपलब्ध नसते. साई चौकाला लागून असलेल्या रेल्वे भुयारी मार्गालगतच्या मोकळ्या जागेत वाहने पार्क करावी लागतात. मात्र येथून पोलीस चौकी एक ते सव्वा किलोमीटर अंतरावर आहे. 

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे होतेय ह्यकोंडीह्णपिंपरी रेल्वे स्टेशनच्या तिकीट घरासमोर हातगाडीवाले, पथारीवाल्यांनी ठाण मांडलेले असते. तसेच रिक्षांचीही येथे गर्दी असते. यातील काही बेशिस्त रिक्षाचालक भर रस्त्यात रिक्षा थांबवितात. वाहतूककोंडी होऊन येथे पादचारी व दुचाकीचालकांनाही कसरत करावी लागते. 

पोलिसांच्या मागणीनुसार चौकीच्या परिसरात पांढरे पट्टे मारून दिले आहेत. त्या पट्ट्यांच्या आतच विक्रेत्यांनी त्यांचे दुकान थाटायचे आहे. अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई होते. विक्रेते, व्यावसायिक, वाहनचालकांसह सर्वांनीच स्वयंशिस्तही पाळणे आवश्यक आहे. - शिरीष पोरेड्डी, प्रवक्ता, स्थापत्य विभाग, महापालिका

पिंपरीतील पोलीस चौकीपर्यंत वाहने घेऊन जाताना पोलिसांनाही कसरत करावी लागते. याबाबत उपाययोजना आवश्यक आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.- कल्याण पवार, वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडParkingपार्किंगTrafficवाहतूक कोंडीbusinessव्यवसाय