वाकड : निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी (दि. १७) रोजी सकाळी सातच्या दरम्यान मृत्यू झाला.पोलीस हवालदार सुनील शेरे (वय ४५, रा. थेरगाव) या असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शेरे आपल्या सरळ कामे आणि मनमिळावू स्वभावामुळे पोलीस खात्यात सर्व परिचित होते. सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी तयार होत असताना त्यांना भोवळ आली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेरे यांची नुकतीच हिंजवडीतून निगडी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या सर्वांचा एक अप्रतिम फोटो त्यांनी फेसबुकवर नुकताच शेअर केला होता.
पोलीस हवालदाराचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; निगडीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:40 IST
निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी (दि. १७) रोजी सकाळी सातच्या दरम्यान मृत्यू झाला.
पोलीस हवालदाराचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; निगडीतील प्रकार
ठळक मुद्देसकाळी ड्युटीवर जाण्यासाठी तयार होत असताना आली भोवळआपल्या सरळ कामे आणि मनमिळावू स्वभावामुळे सुनील शेरे पोलीस खात्यात सर्व परिचित