शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांची स्मार्ट सिटीवर नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 02:21 IST

पुणेऐवजी पिंपरी आयुक्तांवर जबाबदारी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडस्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने ह्यस्मार्ट सिटीह्ण प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील १०० शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पुण्यासह पिंपरी - चिंचवड शहराचाही समावेश आहे. ही योजना राबविण्याकरिता पिंपरी महापालिकेकडून १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या वेळी पिंपरी - चिंचवड शहर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असल्याने पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या १० एप्रिल २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्यता देण्यात आली.नगरविकास विभागाचा आदेश१५ आॅगस्ट २०१८ रोजी पुणे पोलीस आयुक्तालयातून विभाजन होऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा बदल तातडीने करावा, असा आदेश नगरविकास विभागाने जारी केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSmart Cityस्मार्ट सिटी