शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी प्रवाशांची होतेय आर्थिक लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 00:56 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : जास्त-कमी अंतरासाठी सारखेच तिकीट

मंगेश पांडे

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) अनेक मार्गांवर जास्त अंतरासाठी जितका तिकीट दर आकारला जात आहे, तितकाच दर कमी अंतरासाठीही आकारला जात असल्याने यातून प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. पीएमपीच्या बस पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह लगतच्या अनेक मार्गांवर धावतात. या बसमधून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. मात्र, अनेक मार्गांवर प्रमाणापेक्षा अधिक तिकीट दर लावले जात असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. जास्त अंतरासाठी जितका तिकीट दर आहे, तितकाच तिकीट दर कमी अंतरासाठीही आकारला जात आहे. यामध्ये विविध मार्गांवर तिकीट दर आकारणीसाठी निश्चित केलेल्या टप्प्यांनुसार तिकीट दर निश्चित केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, यामुळे जास्त अंतरासाठी असलेलाच तिकीट दर कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्याही माथी मारला जात असल्याचे दिसून येत आहे.

पुणे ते पिंपरी आणि निगडीला सारखेच तिकीटपुणे मनपाहून खडकी, दापोडी, पिंपरीमार्गे निगडी असा प्रवास करणाºयाला २५ रुपयांचे तिकीट दिले जाते. मात्र, मनपाहून पिंपरीत अथवा चिंचवडला उतरणाºया प्रवाशाकडूनही २५ रुपयेच घेतले जातात. निगडीपेक्षा पिंपरी आणि चिंचवडचे अंतर कमी असतानाही निगडीइतकेच भाडे आकारले जाते. त्यामुळे यातून प्रवाशांची आर्थिक लूटच केली जात आहे.तिकीट दरातील तफावतीचा फटकापिंपरी-चिंचवड परिसरातून पुण्याला कामानिमित्त जाणाºयांची संख्या मोठी आहे. लाखो प्रवासी दररोज पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात ये-जा करतात. मात्र, अशाप्रकारे तिकीट दरामध्ये मोठी तफावत असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे.पीएमपी मार्गांवर तिकीट दर आकारणीसाठी टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार तिकीट दरआकारणी केली जाते. मनपाहून निगडीपर्यंत २५ रुपये तिकीट असले, तरी निश्चित केलेल्या टप्प्यानुसार पिंपरी, चिंचवड व त्यापुढील स्थानकांसाठीही २५ रुपये तिकीट दर आकारणी केली जात आहे. - सतीश गव्हाणे, व्यवस्थापक, भक्ती-शक्ती आगार, निगडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड