शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी कर्मचा-यांना महिन्यात एकच रजा, गैरहजेरीचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:30 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) कर्मचा-यांच्या रजेबाबत कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. सर्वच कर्मचा-यांना महिन्यातून केवळ एकच रजा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे.

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) कर्मचा-यांच्या रजेबाबत कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. सर्वच कर्मचा-यांना महिन्यातून केवळ एकच रजा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे.प्रशासनातर्फे काही दिवसांपासून गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जात आहे. गैरहजेरीचे प्रमाण अधिक असल्याने आता पीएमपीचे वाहक, चालक त्याचबरोबर प्रशासनात कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना महिन्यातून केवळ एकच रजा घेण्याची मुभा दिली जाणार आहे. सर्व आगारप्रमुख आणि मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.पूर्वपरवानगीशिवाय कर्मचाºयाने रजा घेतल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही. गैरहजर राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल.ज्या कर्मचाºयांनी या निर्णयाच्या अगोदर दोन रजा घेतल्या असतील, त्यांना सोयीनुसार एकच रजा घेता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.वैद्यकीय रजेसाठी ससून रुग्णालयाच्या अधिकाºयाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. यापूर्वी महापालिक रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात होते. खोटी प्रमाणपत्रे दिली जात असल्याच्या तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आला. कर्मचारी नसल्याने अनेक वेळा फेºया रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. ती आता होणार नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड