शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत प्लास्टिकबंदी कारवाई सुरू : ऐशी हजार रूपयांचा दंड वसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:43 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्लॉस्टिकविरोधातील कारवाई सुरू केली आहे.

ठळक मुद्देएकूण ७३० किलो प्लास्टिक जप्त

पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्लास्टिक पिशव्या वापराविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. सलग तीन दिवसातील सुट्टीच्या दिवशी पिंपरी रिव्हर रोड व पिंपरी बाजारात धडक कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत कारवाई करण्यात आली. ७३० किलो प्लास्टिक जप्त केला असून ऐशी हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्लॉस्टिकविरोधातील कारवाई जोरात सुरू केली आहे. पिंपरी रिव्हर रोड व पिंपरी बाजारात धडक कारवाई केली. ही कारवाई आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरिक्षक बेद राजू  यांचे मार्गदर्शनाखाली विविध टीम तयार करून केली.आरोग्य निरिक्षक  सुरेश चन्नाल, सदाशिव पुजारी, शेखर निंबाळकर, योगेश फल्ले, शांताराम माने,  सतिश इंगेवाड, बाबासाहेब राठोड; तसेच आरोग्य मुकादम  पुखराज रेणवा, आरोग्य कर्मचारी प्रशांत पवार, स्वदेश साळुंके, अरूण राऊत, सचिन छपरीबंद, विशाल दाभाडे, हनुमंत सुरवसे, रविंद्र निला अशा कर्मचाऱ्यांच्या टीम तयार करून एकाच वेळी बाजारपेठेत कारवाई केली. त्यामध्ये सदगुरु किराणा, भावना इमिटेशन्स, पुजा ट्रेडर्स, गुडविल कलेक्शन, आर. आर. कॉफी विहार, रेखा एंटरप्राइजेस, पवन प्रोडक्ट्स, बालाजी हाऊस किपिंग, सागर ट्रेडर्स, साई फरसाण, जयशंकर डेअरी, अफगाण ड्रायफ्रुट, जगदंब ट्रेडर्स, के.डी.एस., महालक्ष्मी शॉपी, बालाजी शॉपी यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. एकूण ७३० किलो प्लास्टिक जप्त केले. प्रत्येकी पाच हजार रुपए यानुसार एकूण ऐशी हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

...... 

तीन दुकानदारांवर गुन्हेपिंपरीतील तीन दुकाने गोविंद ड्रायफ्रूट, झुलेलाल ड्रायफ्रूट, कैलास क्रॉकरी या दुकानांनी प्लास्टिक जप्त करण्यास विरोध केला व दंड भरण्यास नकार दिल्यामुळे त्यांचेवर गुन्हा दाखल केला. 

डॉ. अनिल रॉय म्हणाले,पिंपरीत व्यापाऱ्यांनी जमाव गोळा करून कारवाईस विरोध केल्यामुळे पोलिसांना पाचारण केले होते. त्यानंतर काही दुकानांवर कारवाई केल्यावर व्यापाऱ्यांनी पुढील ७ दिवसांत या भागातील प्लास्टिक नष्ट करू, असे आश्वासन व्यापाऱ्यांनी दिले. त्यानंतर कारवाई थांबविण्यात आली.ह्णह्ण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPlastic banप्लॅस्टिक बंदी