शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

झाडे होणार खिळेमुक्त; महापालिका प्रशासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:27 IST

झाडांवरील जाहिराती तीन दिवसांत काढण्याच्या सूचना

रावेत : जाहिरातदारांकडून शहरातील झाडांवर जाहिरातबाजी करण्यात येत आहे. त्यासाठी झाडांवर खिळे ठोकण्यात येत आहेत. याबाबत उपाययोजना करून अशा जाहिरातबाजांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र महापालिका प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात येत होते. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने याबाबत गुन्हा दाखल करण्याची जाहीर नोटीस बजावली.शहरातील झाडांवर सर्रास खिळे ठोकण्याचे प्रकार काही जाहिरातबाजांकडून करण्यात येत आहे. काही झाडांना ताराही बांधण्यात येत आहेत. त्यामुळे झाडांच्या संवर्धनात अडचणी येत आहे. याबाबत उपाययोजना करून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. दोषी व्यक्ती आणि जाहिरातबाजांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. याची दखल घेऊन सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी जाहीर नोटीस काढून झाडांवर जाहिरात करणाऱ्यांवर महाराष्ट्र विरूपण प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची समज दिली आहे. झाडांवर लावण्यात आलेल्या जाहिराती संबंधित जाहिरातदारांनी तीन दिवसांमध्ये काढून घ्याव्यात, असे आदेशही देण्यात आले आहेत.झाडांना खिळे आणि वेदनामुक्त करण्यासाठी शहरातील काही संघटनांनी पुढाकार घेतला. अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सामाजिक संस्था चार महिन्यांपासून यासाठी अभियान राबवित आहे. या अभियानांतर्गत झाडांवरील खिळे आणि तारा काढण्यात येत आहेत. अंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांनी निगडी प्राधिकरण, चिंचवड येथील संभाजीनगर, रस्टन कॉलनी, थेरगावमधील रस्त्यांवरील झाडांचे १० हजार खिळे काढले आहेत. या अभियानात चाळीसहून अधिक सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. ट्री अ‍ॅक्टनुसार झाडांना इजा पोहोचविणे गुन्हा आहे. त्यानुसार कारवाई करून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी अंघोळीची गोळी संघटनेतर्फे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याबाबत निवेदनही देण्यात आले होते. अंघोळीची गोळी संघटनेचे माधव पाटील, अशोक तनपुरे, अ‍ॅड. सोमनाथ हरपुडे, तुषार शिंदे, अनिल पालघर आदींनी निवेदन दिले होते.खिळेमुक्त झाडे या चळवळीचे हे यश आहे. सर्व सामाजिक संघटना आणि ‘लोकमत’चा यात सिंहाचा वाटा आहे. पिंपरी-चिंचवडमधील झाडांवरचा शेवटचा खिळा निघेपर्यंत ही चळवळ अशीच चालू राहील. पिंपरी-चिंचवड महापालिकने उचलेले पाऊल नक्कीच अभिनंदनास्पद आहे. आता महाराष्ट्राच्या सर्व पालिकांनी याचे अनुकरण करावे.- माधव पाटील, अध्यक्ष, अंघोळीची गोळी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड