शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जागा ६९ अन् विद्यार्थी ७ लाख!, शासनाकडून थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 05:22 IST

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रकाशित झाली. राज्यभरात ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आयोगाकडून केवळ ६९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.

दीपक जाधवपुणे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रकाशित झाली. राज्यभरात ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आयोगाकडून केवळ ६९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. यंदा किमान ४०० ते ५०० जागांची जाहिरात निघेल या आशेवर गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करणाºया उमेदवारांमध्ये यामुळे तीव्र नाराजीची भावना पसरली आहे.राज्य सेवेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जागा ६), वित्त व लेखा सेवा सहायक संचालक (जागा ८), तहसीलदार (जागा ६), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (जागा ४), कक्ष अधिकारी (जागा २६), सहायक गटविकास अधिकारी (जागा १६), उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (जागा २), सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (जागा १) अशा एकूण ६९ जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.खासगी क्षेत्रातील नोकºयांवर गदा आली. प्राध्यापक, शिक्षक पदाची भरती बंद आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एकमेव मार्ग उरला आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान ते डीएड, बीएड, इंजिनिअरिंग, मेडिकल या पदव्यांचे शिक्षण घेत असतानाच मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठी देशभरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागते. त्या तुलनेत राज्य सेवेसाठी होणाºया परीक्षेला जास्त संधी असल्याने त्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या दुष्टचक्रात विद्यार्थी अडकू लागले आहेत. राज्यात २००४च्या सुमारास राज्य सेवेच्या भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उजेडात आले होते. त्यानंतर अनेक वर्षे राज्यसेवेच्या परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले होते.सोशल मीडियावर उमटताहेत पडसादस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांचे अनेक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहेत. यंदा राज्य सेवेच्या परीक्षेसाठी केवळ ६९ जागांची जाहिरात निघाल्याने त्याचे तीव्र पडसाद व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर उमटण्यास सुरूवात झाली आहे. नटसम्राट नाटकातील स्वगत, नाना पाटेकर यांचे डायलॉग याचे विडंबन करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांची व्यथा मांडली जात आहे. त्याचे अनेक व्हिडीओ यू ट्यूब, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर शेअर केले जात आहेत.

टॅग्स :examपरीक्षा