शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत येताहेत उत्तर प्रदेशातून पिस्तूल

By admin | Updated: May 3, 2017 02:35 IST

कधी खंडणी विरोधी पथकाला तर कधी स्थानिक पोलिसांना गस्तीवर असताना, पिस्तूल, गावठी कट्टे विक्री करणारे

पिंपरी : कधी खंडणी विरोधी पथकाला तर कधी स्थानिक पोलिसांना गस्तीवर असताना, पिस्तूल, गावठी कट्टे विक्री करणारे आढळून येत आहेत. उत्तर प्रदेशातून गावठी कट्टे, पिस्तूल राजरोसपणे शहरात आणून विक्री केली जात आहे. उत्तर प्रदेशातून पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला खंडणीविरोधी पथकाने मोशी, बोऱ्हाडेवस्ती येथे पकडले त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला महंमद मोईन समीम उद्दीन ऊर्फ बाबू खान असे त्या आरोपीचे नाव होते. महंमद हा मूळचा उत्तर प्रदेश येथील ग्राम गंदियानी, तालुका सौराव, जिल्हा इलाहाबाद येथील रहिवासी आहे. तो सध्या मोशी आदर्शनगर येथे वास्तव्यास आहे. त्याच्याकडून पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, दहा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून पिस्तूल पुण्यात विक्रीसाठी आणल्याचे त्याने सांगितले होते. यापूर्वी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने चंदन सुरेंद्र सिंग या आरोपीस बेकायदापणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे अटक केली होती. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता. बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुंडांनाही त्याच भागातून खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. चंदन हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो ताथवडेतील एका सिमेंट गोदामात हमाली काम करत असल्याची माहिती तपासात पुढे होती.(प्रतिनिधी)बेकायदा गावठी कट्टा बाळगणाऱ्या विकास ज्ञानोबा जगताप याला चिंचवड पोलिसांनी सापळा रचून अटक केली़ बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आदित्य ऊर्फ बंटी कोकरे यालाही पोलिसांनी परदेशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगलेल्या मुकेश ओमप्रकाश मंगोत्रा याला पोलिसांनी अटक केली. त्याला पिस्तूल, तसेच जिवंत काडतुसे या मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. चेतन विश्वकर्मा याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी विश्वकर्मा याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुंडा स्कॉडच्या पथकाने सापळा रचून मुकेश मंगोत्रा याला पिस्तूल विक्रीस आला असता ताब्यात घेतले होते. चेतन विश्वकर्मा यांच्याकडून २६ हजाराला पिस्तूल विकत घेतल्याची माहिती मुकेशने दिली होती.म्होरक्या सापडेनाबेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला प्रॉपर्टी सेल गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात आठ दिवसांपूर्वीच केली.विशाल राजू दोरवे (वय २५, रा. निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातून राजरोसपणे पिस्तूल शहरात आणून त्यांची विक्री केली जात आहे. उत्तर प्रदेशचे आरोपी येथील पोलिसांच्या हाती लागूनही या रॅकेटच्या मुळाशी पोहोचणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे वर्षभरात शहरातील पिस्तूल मार्केट आणखी वाढले आहे.