शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी न्यायालयाचा होणार विस्तार, महापालिकेचा ग्रीन सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 06:43 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आहे़ मोरवाडी चौकातील इमारतीतील जागा कमी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आहे़ मोरवाडी चौकातील इमारतीतील जागा कमी पडत असल्याने न्यायालयाचा विस्तार करणे अवघड झाले होते. मात्र, जागेच्या प्रश्नाबाबत बार असोसिएशन, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात बैठक झाली. ‘ महापालिकेची अजमेरा कॉलनी येथील इमारत मोरवाडी न्यायालयासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. मोरवाडी येथे एकच न्यायालय सुरू आहे. मात्र, न्यायालयासाठी ही जागा कमी पडत आहे. पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी न्यायालयासाठी मोठी जागा देण्याची मागणी केली आहे. प्राधिकरणाच्या मोशीतील जागेत आरक्षणही विकसित करण्यात येणार आहे. मात्र, त्यास गती मिळालेली नाही. याबाबत तात्पुरता तोडगा काढावा, अशी मागणी असोसिएशनने केली होती.दरम्यान या प्रश्नासाठी गुरुवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला पक्षनेत्यांसह बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण पवार, सुहास पडवळ, सतीश गोरडे, सुनील कड, श्रीकांत दळवी, विजय भगत आदी उपस्थित होते. बैठकीविषयी माहिती देताना एकनाथ पवार म्हणाले, ‘‘अजमेरा कॉलनी येथे महापालिकेची इमारत आहे. २४ वर्ग असलेली इमारत डॉ. डीय. वाय. पाटील महाविद्यालयाला भाडेतत्त्वार दिली होती. आता ती इमारत पालिकेच्या ताब्यात आहे. न्यायालयासाठी ती इमारात भाडेतत्त्वावर देण्याचे तत्त्वत: मान्य करण्यात आले आहे. ’’‘लोकमत’च्या वृत्ताचीही दखलपिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या वर्धापनदिनी ‘लोकमत’ने न्यायालयास जागा मिळणार कधी? असे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल शासनाने घेऊन मोशीत जागाही आरक्षित केली होती. तात्पुरती जागा उपलब्ध व्हावी, अशीही मागणी केली होती. त्यास मुहूर्त मिळाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय