शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांच्‍या जाचाला कंटाळून कुटुंबाची सामूहिक आत्‍महत्‍या, पत्‍नी,मुलाचा मृत्‍यू, पती जखमी

By नारायण बडगुजर | Updated: January 18, 2025 17:09 IST

Crime News: सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील पत्‍नी आणि मुलाचा मृत्‍यू झाला. तर पती जखमी असून रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

- नारायण बडगुजरपिंपरी - सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील पत्‍नी आणि मुलाचा मृत्‍यू झाला. तर पती जखमी असून रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. चिखली येथील सोनवणे वस्‍तीत ही धक्कादाय घटना उघडकीस आली. २०१६ ते १८ जानवोरी २०२५ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी महिलेसह चौघांच्या विरोधात गुन्‍हा दाखल केला.

शुभांगी वैभव हांडे (वय ३६) आणि धनराज वैभव हांडे (९) अशी आत्‍महत्‍या केलेल्‍यांची नावे आहेत. शुभांगी यांचे पती वैभव मधुकर हांडे (४५, सर्व रा. सोनवणे वस्‍ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. संतोष कदम, संशयित महिला (दोघेही रा. ताथवडे), संतोष पवार (रा. कुदळवाडी, चिखली) आणि जावेद खान (रा. मोई, ता. खेड) यांच्‍या विरोधात पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला.

वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक विठ्‌ठल साळुंके यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संतोष कदम याच्‍याकडून फिर्यादी वैभव यांनी सहा लाख रुपये दरमहा १० टक्‍के व्‍याजाने घेतले होते. संशयित महिलेकडून दोन लाख रुपये १० टक्‍के दरमहा व्‍याजाने घेतले होते. जावेद खान याच्‍याकडून चार लाख रुपये व्‍याजाने घेतले होते. त्‍याबदल्‍यात संतोष कदम याला त्‍याच्‍या मुद्‌दल रकमेची परतफेड करून नऊ लाख ५० हजार रुपये दिले होते. तसेच फिर्यादी वैभव यांच्‍या नावावर असलेली एक एकर जमीनही लिहून दिली होती. संशयित महिलेला दरमहा २० हजार रुपये देऊन स्‍वतःच्‍या मालकीची २० गुंठे जमीन लिहून दिली होती. तरी देखील संशयित महिलेने १४ लाख रुपये दिल्‍याशिवाय जमीन परत देणार नाही, असा तगादा लावला.

संशयित जावेद खान याने दिलेल्‍या कर्जापोटी व्‍याज म्‍हणून चार लाख ५० हजार रुपये त्‍याला दिले. संशयित संतोष पवार याच्‍याकडूनही साडेसात लाख रुपये घेतले होते व त्‍यापैकी बहुतांश रक्‍कम परत दिली होती. तरी देखील संशयितानी व्‍याजाचे पैसे देण्‍यासाठी तगादा लावला. फिर्यादी वैभव हांडे यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्‍यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

सामूहिक आत्महत्यासावकारांच्‍या या त्रासाला कंटाळून त्‍यांनी सामुहिक आत्‍महत्‍या करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यांच्‍याच मेडिकलमधून झोपेच्‍या गोळ्या खाल्‍ल्‍या. तसेच तिघांनीही छताच्‍या पंख्‍याला गळफास घेतला. या घटनेत पत्‍नी शुभांगी व मुलगा धनराज यांचा मृत्‍यू झाला.

मुलाला पाठविली सुसाइड नोटफिर्यादी वैभव यांच्‍या १४ वर्षीय मुलाला त्‍यांनी मुंबईतील नातेवाइकांकडे पाठविले होते. आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी त्‍यांनी शुक्रवारी सकाळी आपल्‍या मुलाच्‍या मोबाइलवर सुसाइड नोट पाठविली होती. रात्री मुलाने ही सुसाइड नोट पाहिली असता त्‍यांनी आपल्‍या पालकांना फोन केला. मात्र त्‍यांनी उचलला नाही. त्‍यामुळे त्‍याने शेजार्‍यांना फोन केला. त्‍यांनी दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्‍याने त्‍यांनी रात्री पोलिसांना पाचारण केले. त्‍यानंतर आत्‍महत्‍येचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांच्‍या तत्‍परतेमुळे वाचले प्राणघटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. फिर्यादी वैभव हे जिवंत असल्‍याचे दिसून येताच त्‍यांनी त्‍वरित त्‍यांना रुग्‍णालयात दाखल केल्‍याने त्‍यांचे प्राण वाचले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड