शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिका प्रशासन करतेय सल्लागार पोसण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 13:48 IST

मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सल्लागार नियुक्त करावे लागत आहेत, असे उत्तर प्रशासनाने दिले आहे.

ठळक मुद्दे सल्लागारांवर होणारी उधळपट्टी थांबवायला हवी़सल्लागार नियुक्तीच्या नावाखाली लूट कामांना गती मिळावी, यासाठी सल्लागार घेणे आवश्यक

पिंपरी : महापालिकेतील विविध प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्त करण्याचे प्रमाण वाढत आहे, याचे पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीत उमटले. प्रशासन सल्लागार पोसण्याचे काम करीत आहे, अशी टीका विरोधीपक्षांनी केली असून, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सल्लागार नियुक्त करावे लागत आहेत, असे उत्तर प्रशासनाने दिले आहे.स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. सल्लागार नियुक्तीच्या विषयावरून जोरदार चर्चा झाली. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, सल्लागारांवर महापालिका मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे. एकाच प्रकारची कामे असतील तर वेगवेगळे सल्लागार कशासाठी? यासाठी स्वतंत्र विभाग करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे चे मयूर कलाटे म्हणाले, सल्लागार नियुक्तीच्या नावाखाली लूट होत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच संधी देऊन काम करवून घ्यायला हवे. सल्लागार नियुक्तीचे नवीन खूळ बंद करायला हवे.

प्रवीण भालेकर म्हणाले, सत्ताधारी विविध प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्त करतात. ही चुकीची बाब आहे. याविषयी धोरण ठरविण्याची गरज आहे. सल्लागार नियुक्तीवरील खर्च टाळण्याची गरज आहे.

गीता मंचरकर म्हणाल्या, महापालिकेच्या वतीने कोणत्याही कामांसाठी सल्लागार नेमले जातात़. सल्लागार नीट काम करतात की नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे़. सल्लागारांवर होणारी उधळपट्टी थांबवायला हवी़.

अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, एकाच प्रकारची कामे असतील तर सल्लागारासाठी होणारा खर्च कमी करता येईल. शाळा बांधणीचे काम असेल तर त्यासाठी विविध कामात सल्लागारांसाठी वेगवेगळा खर्च होतो. सल्लागार नियुक्तीपेक्षा एखादा विभाग तयार करून त्यातून काम करता येते का ते पहावे. याविषयी प्रशासनाने भूमिका मांडावी. 

त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहराची पाच लाख लोकसंख्या होती. तेव्हापासून असणारे मनुष्यबळ आता आहे. तसेच आपला आकृतिबंधही शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. अभियंत्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कामांना गती मिळावी, यासाठी सल्लागार घेणे आवश्यक आहे. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर सल्लागार नियुक्त करण्याची गरज भासणार नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड