शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीचे महापौर अडकले लिफ्टमध्येच ; सुरक्षा रक्षकांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:38 IST

साधारण दहा ते पंधरा मिनिटे लिफ्टमध्ये अडकलेल्या महापौरांना तसेच नगरसेविकांना लिफ्टमनच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

ठळक मुद्देतीन आठवड्यापूर्वी एक पत्रकार वीस मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्याची घटना

पिंपरी :तांत्रिक बिघाड झाल्याने महापौर नितीन काळजे यांच्यासह तीन नगरसेविका लिफ्टमध्ये बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास अडकल्या. महापालिका प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्येच अडकल्याने मदतीसाठी धाव घेतलेल्या सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. साधारण दहा ते पंधरा मिनिटे लिफ्टमध्ये अडकलेल्या महापौरांना तसेच नगरसेविकांना लिफ्टमनच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. महापालिका भवनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी महापौर काळजे सकाळीच महापालिकेत आले. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर महापौर कक्षाकडे निघाले. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यामध्ये काही अंतरावर लिफ्ट अडकली. महापौर नितीन काळजे यांच्याबरोबर अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, कमल घोलप या नगरसेविकासुद्धा लिफ्टमध्ये अडकल्या होत्या. महापौर लिफ्टमध्ये अडकल्याचे समजताच सुरक्षा रक्षकांनी धावाधाव केली. लिफ्टमनच्या मदतीने दुसऱ्या मजल्यापर्यंत नेण्यात आली. दुसऱ्या मजल्यावर अखेर महापौर आणि नगरसेविका लिफ्टमधुन सुखरूप बाहेर काढण्यात आले.  तीन आठवड्यापूर्वी एक पत्रकार वीस मिनिटे लिफ्टमध्ये अडकून पडला होता. तर चार महिन्यापूर्वी लिफ्टमध्ये पाय अडकल्याने एका कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत झाली होती. लिफ्टमधील तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधून दुरूस्ती करावी, अशा सूचना महापौर काळजे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौर