शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एका रेशनिंग कार्यालयावर पिंपरी-चिंचवडकरांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 02:58 IST

नागरिकांची होतेय गैरसोय, ‘अ’ व ‘ज’ परिमंडल; कामकाजावर येतोय ताण

- मंगेश पांडे पिंपरी : अन्नधान्य व पुरवठा विभागाच्या ‘अ’ (चिंचवड विधानसभा) व ‘ज’ (पिंपरी विधानसभा) या दोन परिमंडल विभागाचे कामकाज सध्या एकाच कार्यालयातून सुरु असल्याने येथील कामकाजावर ताण येत आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या दोन्ही कार्यालयाचा कारभार स्वतंत्र करण्याचे नियोजित आहे. मात्र, त्यास अद्यापही मुहुर्त लागलेला नाही.रेशनिंग कार्यालयाच्या परिमंडल कार्यालयांची रचना विधानसभानिहाय करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी एक कार्यालय आहे. मात्र, पिंपरी व चिंचवड हे विधानसभा संघ मिळून एकत्रितच कार्यालय आहे. यामुळे येथील कामकाजावर ताण येत आहे.निगडीतील संत तुकाराम व्यापार संकुलाच्या इमारतीत सध्या ‘अ’ आणि ‘ज’ विभागाचे एकत्रित कार्यालय आहे. ‘अ’ विभागात चिंचवड विधानसभेतील ९७ तर ‘ज’ विभागात पिंपरी विधानसभेतील ८३ रेशन दुकानदारांचा समावेश आहे. ‘अ’ विभागात म्हणजेच चिंचवड विधानसभा मतदार संघात २९ हजार ५२४ कार्डधारक आहेत. तर ‘ज’ विभागात म्हणजेच पिंपरी विधानसभा मतदार संघात ८३ हजार ३१६ कार्डधारक आहेत. या दोन्ही मतदार संघातील कामकाज एकाच कार्यालयात केले जात असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. तसेच यामुळे कामकाजावरही परिणाम होतो.नवीन शिधापत्रिका काढणे, नावात दुरुस्ती करणे आदी कामांसाठी निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ लागतो. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, ‘अ’ आणि ‘ज’ विभागासाठी स्वतंत्र परिमंडल कार्यालय सुरु करण्याचे नियोजित आहे.स्वतंत्र कार्यालयाची मागणीपिंपरी-चिंचवड शहरांतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये भोसरी विधानसभेसाठी ‘फ’ परिमंडल अधिकारी कार्यालय आहे. हे कार्यालय लवकरच भोसरीतील पांजरपोळ येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीतच सुरु करण्यात येणार आहे. याच धर्तीवर ‘अ’ आणि ‘ज’ परिमंडल अधिकारी कार्यालयही लवकरच स्वतंत्र सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.सध्या एकाच कार्यालयात ‘अ’ व ‘ज’ विभागाचे कामकाज सुरु आहे. उपलब्ध मनुष्यबळात दोन्ही विभागाचे कामकाज केले जाते. दोन्ही विभाग स्वतंत्र झाल्यास कामाचा भार हलका होण्यास मदत होईल. - दिनेश तावरे,परिमंडल अधिकारी, ‘अ’ व ‘ज’ विभाग.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड