शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या रिक्त आठ सदस्यांची झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 14:49 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ सदस्यांची आज बुधवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ सदस्यांची आज बुधवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रिक्त झालेल्या पक्षाच्या संख्याबळानुसार भाजपाच्या सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपकडून विलास मडीगेरी, राहुल जाधव, शीतल शिंदे, ममता गायकवाड, नम्रता लोंढे, सागर अंगोळकर तर राष्ट्रवादीकडून गीता मचरकर, प्रज्ञा खानोलकर या दोघीची स्थायीत वर्णी लागली आहे. महापौर नितीन काळजे यांनी स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा केली. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ नगरसेवक विलास मडीगेरी यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.पिंपरी महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा असतो. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. तेवढेच सदस्य पुन्हा नव्याने निवडले जातात. त्यानुसार स्थायीमधील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले आहेत. त्यात अध्यक्षा सीमा सावळे यांचा देखील समावेश आहे. भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन महिला नगरसेविका बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या.सभागृह नेते एकनाथ पवार यांनी भाजपच्या तर विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिली. त्यानंतर संबंधितांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर काळजे यांनी केली.दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले नगरसेवक राहुल जाधव यांच्या गळ्यात पडण्याची दाट चिनहे होति. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राहुल जाधव, शितल शिंदे आणि विलास मडीगेरी यांच्यात चूरस आहे. अध्यक्षपदाची माळ नगरसेवक विलास मडीगेरी यांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड