शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

पिंपरी-चिंचवड आरटीओचे कामकाज मंगळवारपासून सुरू होणार; ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 22:59 IST

प्रत्येक कामकाजाबाबत ऑनलाईन कोटा निश्चित करण्यात आला आहे.

पिंपरी : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कठोर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) पक्के तसेच शिकाऊ परवाना, नुतनीकरण आदी कामकाज मंगळवारपासून (दि. ८) मर्यादित स्वरुपात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कोटा निश्चित करण्यात आला असून, संबंधितांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. 

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन आदेशानुसार आरटीओ कार्यालयात कामकाज सुरू करण्यात येत आहे. कार्यालयातील मनुष्यबळाच्या प्रमाणात मर्यादित स्वरुपात ही सेवा सुरू राहणार आहे. त्यात शिकाऊ व पक्के लायसन्स, परवाना नुतनीकरण, त्याची दुय्यम प्रत देणे, वाहन हस्तांतरण, वाहनास नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहन नोंदणी दुय्यम प्रत देणे, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र जारी करणे, कर्ज बाेजा चढविणे व उतरविणे इत्यादी कामकाज तसेच वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे व परवाना विषयक कामकाज हे मर्यादित स्वरुपात सुरू करण्यात येणार आहे. 

प्रत्येक कामकाजाबाबत ऑनलाईन कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधितांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानुसार त्यांना अपॉईंटमेन्ट देण्यात येईल. अर्जदारांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRto officeआरटीओ ऑफीसcorona virusकोरोना वायरस बातम्या