शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड पाचव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:55 IST

स्मार्ट सिटी आणि स्वच्छता भारत अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बिरुदावलीत आणखी एक भर पडली आहे.

पिंपरी : स्मार्ट सिटी आणि स्वच्छता भारत अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बिरुदावलीत आणखी एक भर पडली आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट असलेल्या एका खासगी संस्थेने देशातील जगण्यासाठी सुयोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवा क्रमांक आला आहे.देशातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. गेल्या ३० वर्षांत येथील लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. झपाट्याने वाढणा-या लोकसंख्येमुळे देशातील अनेक शहरे भकास झाली आहेत. हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र, काही शहरांचे नियोजन अतिशय योग्यरीत्या झाल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेने देशातील सुनियोजित अशा शहरांची एक स्पर्धा घेतली होती.जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या या स्पर्धेत १० निकष ठेवले होते. त्यात नियोजन, दळणवळण सुविधा, मूलभूत सुविधांचे प्रमाण, दैनंदिन गरजा, विश्रांती व मनोरंजन, स्मार्ट प्रशासन, सुरक्षितता व निर्भयता, नोकरीच्या संधी, पर्यावरण व शाश्वत विकास, बांधकाम क्षेत्राची कामगिरी, भविष्याचा विस्तार, दृष्टिकोन हे निकष ठेवण्यात आले होते. या निकषांत पहिल्या पाचमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक लागला आहे.पिंपरी-चिंचवड हे शहर अत्यंत वेगाने विकसित झालेले शहर आहे. आता या शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही राज्यात पहिला आणि देशात नववा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर सुयोग्य शहराच्या यादीत शहरास पाचवा क्रमांक मिळाला आहे, ही भूषणावह बाब आहे. आपले शहर रहिवाशांसाठी सर्वोत्तम शहर आहे, यावर मोहोर उमटविली आहे. - श्रावण हर्डीकर,महापालिका आयुक्त