शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रस्ते खोदाईसाठी ‘नागपूर पॅटर्न’, खड्डे बुजविण्याची जबाबदारी महावितरणवर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 05:12 IST

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महावितरणकडून नव्याने ७० किलोमीटर उच्चदाब वाहिनी, तर २९ किलोमीटर लघुदाब वाहिनी भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे. रस्ता पुनर्स्थापनेबाबत नागपूर महापालिका आणि महावितरण यांच्यात सामंजस्य करार झाला असून, रस्त्याचे चर बुजविण्याचे काम महावितरणकडे सोपविण्यात आले आहे.या ‘नागपूर पॅटर्न’नुसार महावितरणकडून एकत्रित रस्ता दुरुस्ती खर्च आणि अधिभार शुल्क घेण्याऐवजी ...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महावितरणकडून नव्याने ७० किलोमीटर उच्चदाब वाहिनी, तर २९ किलोमीटर लघुदाब वाहिनी भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे. रस्ता पुनर्स्थापनेबाबत नागपूर महापालिका आणि महावितरण यांच्यात सामंजस्य करार झाला असून, रस्त्याचे चर बुजविण्याचे काम महावितरणकडे सोपविण्यात आले आहे.या ‘नागपूर पॅटर्न’नुसार महावितरणकडून एकत्रित रस्ता दुरुस्ती खर्च आणि अधिभार शुल्क घेण्याऐवजी पिंपरी महापालिकेने चर बुजविण्याचे काम महावितरणकडेच सोपवावे. तसेच, चर दुरुस्ती अथवा दोष उत्तरदायित्व कालावधीत रस्ता सुस्थितीत ठेवण्यास महावितरण असमर्थ ठरली तर महापालिकेने रस्ता दुरुस्ती करावी. त्याचा खर्च महावितरणच्या वीजबिलातून वजा करावा, असा धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत विविध रस्त्यांमधून भूमिगत सेवावाहिन्या टाकल्या जातात. सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्था रस्ता खोदाईसाठी महापालिकेकडे अर्ज करतात. नागरिकांच्या सोईसाठी सेवावाहिन्या आवश्यक असल्याने महापालिका भूमिगत खोदकामाला परवानगी देते. त्यासाठी रस्ता दुरुस्ती खर्च महापालिकेने निश्चित केला आहे. तो संबंधितांकडून आगाऊ वसूल करण्यात येतो. सध्या प्रतिमीटर रस्ता दुरुस्ती खर्च सरासरी ६ हजार ५०० रुपये आणि महापालिका अधिभार सरासरी ३ हजार रुपये आहे. खासगी, सरकारी-निमसरकारी संस्थांना सेवावाहिन्या टाकण्यासाठी हे शुल्क आकारुन रस्ता खोदकामासाठी परवानगी दिली जाते. खोदकामानंतर महापालिका निविदा काढून चर बुजविण्याचे काम देते.पायाभूत आराखड्यांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला रस्ते खोदकामाचा सवलतीचा दर बहाल केला आहे. त्यानुसार एकत्रित रस्ता दुरुस्ती खर्च आणि अधिभार शुल्कापोटी महावितरणकडून दीड हजार रुपये आकारण्यात येते असे. सेवावाहिन्यांसाठी खोदलेल्या चरांची दुरुस्ती महापालिकेतर्फे केली जाते. सध्या पायाभूत आराखडा - २ अंतर्गत भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी २ हजार ३०० रुपये प्रतिमीटर शुल्क आकारले जाते.सन २०१५-१६ मध्ये महावितरणने ७९.४२ किलोमीटर रस्त्याची खोदाई केली. त्यापोटी १८ कोटी २६ लाख रुपये शुल्क पिंपरी महापालिकेने आकारले. तर, सन २०१६ - १७ मध्ये दीड किलोमीटर खोदाईसाठी २६ लाख रुपये घेतले. सन २०१७ - १८ मध्ये केवळ २ लाख ३० हजार रुपये शुल्क महापालिका कोषागारात जमा झाले.सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर१ पुणे महापालिका महावितरणकडून प्रतिमीटर २ हजार ३५० रुपये शुल्क आकारते. हेच शुल्क पिंपरी महापालिकेने आकारावे, अशी विनंती महावितरणच्या पुणे परिमंडल मुख्य अभियंत्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. महावितरणला पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नव्याने ७०.१६ किलोमीटर उच्चदाब वाहिनी, तर २८.३५ किलोमीटर लघुदाब वाहिनी भूमिगत करायची आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने १८ मार्च २०१६ रोजी नागपूर महापालिका आणि महावितरण यांच्यातील ‘रोड रिइंस्टेटमंट’बाबतचा सामंजस्य करार राज्यातील सर्व महापालिकांना पाठवीत त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याचा आधार घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचा सर्वसाधारण सभेपुढे सादर केला.कार्यकारी अभियंताच समन्वयक२या सामंजस्य करारानुसार, क्षेत्रीय कार्यालयांच्या स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची महापालिका समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल. महावितरणचे समन्वय अधिकारी आणि महापालिकेचे समन्वय अधिकारी एकत्रितपणे रस्तेकामाची पाहणी करतील. आयुक्तांच्या मान्यतेनंतर महावितरणकडून प्रतिमीटर १०० रुपये देखरेख शुल्क आकारले जाईल. त्या वेळी रस्ते खोदाईची परवानगी दिली जाईल. खोदकामानंतर चर बुजविण्याची जबाबदारी महावितरणची असेल. स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून महावितरणने ‘ना हरकत’ दाखला घेणे बंधनकारक आहे. या कामासाठी दोष उत्तरदायित्व कालावधी दोन वर्षांचा असेल. चर सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी महावितरणची असणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड